कोर कमिटी अध्यक्ष जगन्नाथ खामकर यांचे आवाहन..

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.३सप्टेंबर,२०२४

समाजामध्ये वावरताना आपण आपल्यासमोर घडलेल्या अनेक घटना पाहत असतो,

यामध्ये कुठे गरीबावर अन्याय होतो, कुठे शेतकऱ्यावर, तर कुठे मुलीवर बलात्कार होतो. समाजामध्ये जातीय दंगे घडवून आणले जातात. 

याचेच काही राजनेता स्वतःच्या स्वार्थासाठी भांडवल करतात. 

 किती दुर्भाग्याची गोष्ट आहे ना...!! 

 आपण मौन राहून, हे सर्व उघड्या डोळ्यांनी पहात असतो. 

 काहीही प्रतिक्रिया देत नाही. 

आज जी इतरांची परिस्थिती आहे, जर तशी परिस्थितीवर तुमच्यावर आली तर, तुम्ही काय करणार? 

याची देखील जाणीव ठेवावी. 

म्हणून आपण जसे वागत आहात ते योग्य आहे का?

 हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. 

वाईट प्रसंग कुणालाही सांगून येत नाही. 

म्हणून सर्वांनी जागृत राहावे.

 कुणावर अन्याय होत असेल त्याचा सर्वांनी मिळून प्रतिकार करावा.

 अन्याय करणाऱ्यांना वेळीच आळा घातला पाहिजे. 

आज हीच काळाची गरज आहे. 

त्याला अशी चपराक बसवा की, पुन्हा तशी चूक करण्याचे धाडस ते स्वप्नात देखील करणार नाही. लक्षात ठेवा...!!

महाभारतामध्ये पितामह भीष्म मौन राहिले होते.

त्याचे परिणाम आपण सर्वांना माहीतच आहे. 

जर ते मौन राहिले नसते तर, त्या वेळची परिस्थिती वेगळी असती. 

म्हणून आपण सर्वांनी आपले मौन व्रत वेळीच तोडावे.

सत्याची साथ द्यावी.

चांगले कार्य करीत असणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. 

म्हणजे ते आणखी जोमाने कार्य करतील. 

जे काम आपण स्वतः करू शकत नाही.

तिथे कमीत कमी गप्प बसावे. कुणाचेही मनोबल तोडू नये. 

संघटना, समाज आणि पक्षामध्ये काम करणाऱ्यांकडून चुका होणारच. 

जो काम करणार नाही, त्याच्या चुका कशा होणार? 

म्हणून काम करताना ज्यांच्याकडून चुका झाल्या आहेत. 

त्यांना  चुका सुधारण्याची संधी द्यावी. 

त्यामुळे ते, त्यामध्ये सुधारणा करू शकतात.

 पुन्हा त्याच चुका करायला लागले तर त्यांचे वेळीच कान धरा. 

त्यांना वेळीच सावध करा. 

समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी वेळ लागतो. 

ही गोष्ट आपण सर्वांना माहित आहे. 

भूतकाळात झालेल्या चुका त्यांचा पिछा कधीही सोडत नाही. 

म्हणून चुकीचे काम करताना दहा वेळा विचार करा...!! 

आपला स्वाभिमान कोणत्याही परिस्थितीमध्ये दावणीला बांधू नका!!

आपल्यामध्ये खूप अनुभवी सैनिक, शेतकरी, नोकरदार आणि मजदूर आहेत. 

त्यांच्यामध्ये योग्य सुसंवाद साधा! 

समन्वयाने सर्वांना जागृत करा. 

आपणाला संधी चालून आली आहे. 

त्या संधीचे सोने करा. 

अशी संधी वारंवार मिळणार नाही. 

हवा योग्य दिशेने वाहत आहे. 

हवेचा रूख ओळखा...!!

 आपण सर्वांना नव नियुक्त झालेली  कोर कमिटी नम्र निवेदन करीत आहे की, आम्ही  प्रामाणिकपणे कार्य करीत आहोत. 

आम्हाला प्रोत्साहन देऊ शकले नाही तरी चालेल...

परंतु आमचे मनोबल तोडू नका...!! 

लक्षात ठेवा...!! 

प्रामाणिकपणा ही अत्यंत महाग गोष्ट आहे.

सगळ्यांना ती परवडत नाही. 

जे चुकीचे कार्य करीत आहे. 

त्यांना वेळीच थांबवा!

तुमच्या मध्ये जे कौशल्य आहे. त्याला ओळखा!! 

 ते कौशल्य दाखवण्याची हीच खरी ती वेळ आहे. 

भारतीय जवान किसान पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे.

हा पक्ष सैनिक, शेतकरी व सर्वसामान्यांचा पक्ष आहे. 

म्हणून सर्वांनी प्रत्यक्ष या अप्रत्यक्ष रूपाने तुमचे योगदान दिलेच पाहिजे.

तुमच्या समर्थांना शिवाय ही गोष्ट करणे शक्य नाही हे आम्हाला माहित आहे. 

हा पक्ष सत्तेमध्ये कसा येऊ शकतो?

यासाठी प्रयत्न करा. 

या मंचाद्वारे मी आपण सर्वांना कोर कमिटी अध्यक्ष या नात्याने पुन्हा आवाहन करीतो की,

आता तरी आपण आपसामधील मतभेद विसरून जा...!! 

एकत्र या, संघटित व्हा आणि सरकार व प्रशासनाला दाखवून द्या की, जर आम्ही सर्व मिळून संघटित झालो तर, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.  

आपल्या पक्षाला फायदा होईल असे चांगले मुद्दे द्या.

पक्षांमधील पदाधिकाऱ्यांकडून काही चुकत असेल तर वेळीच मार्गदर्शन करा. 

आपण केलेल्या चांगल्या मार्गदर्शनाची कोर कमिटी स्वागतच करेल. 

आपण सर्वांनी पक्षाला संधी द्यावी. 

आम्ही आपणाला ग्वाही देतो की, आपला भरोसा आम्ही कोणत्याही परिस्थितीत तुटू देणार नाही.

                जगन्नाथ खामकर

                 कोर कमिटी अध्यक्ष

      भारतीय जवान किसान पार्टी महाराष्ट्र राज्य.

Related Post