दिक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेचे श्रीगोंदा येथे पोस्टर प्रकाशन..!

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

दि. २३ जुलै २०२४ 

प्रतिनिधी,

शनिवार दि.२० रोजी शासकीय विश्रामगृह श्रीगोंदा येथे पत्रकार संवाद यात्रा पोस्टर प्रकाशन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश संघटक संजय भोकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पीएसआय मनोज खिळदकर, श्रीगोंदा तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.अशोक वाळुंज, राज्य माध्यमिक शिक्षकेतर महासंघाचे महासचिव पाराजी मोरे, जिल्हा शिक्षकेतर महासंघाचे जेष्ठ मार्गदर्शक समशेर पठाण, प्रहार संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष कृष्णा खामकर,प्रहारचे युवक तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड,लहुजी सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोस्टर प्रकाशन करण्यात आले.


महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पत्रकार संवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे याची सुरुवात दीक्षाभूमी नागपूर येथून होत असून या यात्रेचा मंत्रालय मुंबई येथे समारोप होणार आहे लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ही संवाद यात्रा असेल. श्रीगोंदा येथे शासकीय पदाधिकारी तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.


यावेळी पत्रकार माधव बनसुडे, संदिप (दादा) सोनवणे, राजेंद्र राऊत, डाॅ.अमोल झेंडे, नंदकुमार कुरुमकर, मेजर भिमराव उल्हारे, किशोर मचे,नितीन रोही, शफीक हवालदार, दत्ता जगताप, अनिल तुपे,सोहेल शेख, अमर घोडके, ज्ञानेश्वर येवले, श्रीरंग साळवे, धनेश गुगळे, सतिष ओहोळ, वैभव हराळ आदी पत्रकारांच्या उपस्थितीत हा पोस्टर प्रकाशन कार्यक्रम पार पडला.


            .चौकट. 

या संवाद यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मांडण्याचा हक्क पत्रकारांना निर्माण झाला आहे येत्या २ ऑगस्ट रोजी ही संवाद यात्रा अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे येणार आहे जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या संवाद यात्रेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे

Related Post