संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.५सप्टेंबर २०२४
पाच सप्टेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.
भारतात या दिवसाला शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.
आई वडिलांनंतर शिक्षक हेच आपले खरे गुरु असतात.
ज्याप्रमाणे कुंभार मडक्याला आकार देऊन घडवतो.
त्याचप्रमाणे ज्यांनी - ज्यांनी मला घडविले आहे.
अशा सर्व गुरूंचा मी ऋणी आहे.
मातृऋण , पितृऋण आणि आचार्यऋण मानणारी आपली संस्कृती.
मातृदेवोभव म्हणजे आईला देव मान!
पितृदेवोभव म्हणजे वडिलांना देव मान!
आणि आचार्य देवोभव म्हणजे शिक्षकांना देव मान !
असं शिकवणारं आपलं शास्त्र!
त्यामुळं शिक्षक दिनीच नाहीतर सदैव प्रत्येकक्षणी शिक्षकांच्या व आपल्या गुरूंच्या कर्तृत्वाचा योग्य तो सन्मान केला पाहिजे. आपले शिक्षक व गुरु आपल्याला अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.
शिक्षक आणि गुरु हे ज्ञानाचा आणि पवित्रतेचा सागर आहे.
ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो,
जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळे आणि गुरु मुळे कळतो
शिक्षक आणि गुरु प्रेरणास्त्रोत असतात, ते आपल्याला प्रेरणा देतात.
त्यांच्यामुळेच आपले जीवन घडते.
म्हणूनच
मी नेहमी आपल्या गुरूंचा आदर करितो.
आज शिक्षक दिन या शुभ दिनी आपण सर्वांनी संकल्प घेतला पाहिजे की, आपणाला शिक्षकांनी व आपल्या गुरुंनी जे ज्ञान दिलेले आहे.
त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, आपणाकडे जे काही चांगले ज्ञान आहे ते तुम्ही समाजातील सैनिक, शेतकरी, नोकरदार व मजूर यांना द्याल.
पुन्हा मी माझ्या गुरूंना वंदन करितो.
कारण त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी आपल्या जीवनात काहीही करू शकत नाही.
म्हणून त्यांच्या ऋणंणामधून मुक्त होण्याचा प्रयत्न करील.
आणि आपण सर्वांना निवेदन करितो की, आपण देखील या ऋणामधून मुक्त होण्यासाठी आपल्याकडे असलेले ज्ञान सर्वांना द्यावे.
जगन्नाथ खामकर
कोर कमिटी अध्यक्ष
भारतीय जवान किसान पार्टी.
महाराष्ट्र राज्य