डीजे फाटा देऊन कीर्तनकारां समवेत बैलपोळा साजरा

संघर्षनामा वृत्तसेवा lकर्जत

 दि.३ सप्टेंबर २०२४ 

प्रतिनिधी, उज्वला उल्हारे 

कर्जत तालुक्यातील ज्योतिबावाडी येथील प्रगतशील बागायतदार सागर काळंगे यांनी नंदी राजाचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच बैलपोळा या वर्षी अगदी थाटामाटात साजरा केला. या प्रसंगी महाराष्ट्रातील नामवंत युवा कीर्तनकार विनोद मुर्ती व आदिशक्ती मुक्ताई पालखीचे मानकरी ह.भ.प. निलेश महाराज वागसकर हे प्रमुख पाहुणे म्हणून या प्रसंगी उपस्थित होते.डीजे विरहित ज्योतिबावाडी येथे बैलपोळा सण साजरा करण्यात आला येथील ग्रामस्थांनी कीर्तनकारांसमवेत पोळ्याचे आगळे वेगळे नियोजन केल्याने सर्वत्र या गोष्टीचे कौतुक होत आहे.


आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी पूर्वीची अवजारे आणि बैलांचे महत्व अजूनही कायम आहे. शेतकर्‍यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या शेतकर्‍यांचा सर्जा राजा अर्थात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 


पोळा हा महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील शेतकऱ्यांद्वारे साजरा केला जाणारा कृतज्ञता सण आहे, जे बैल आणि बैलांचे महत्त्व ओळखण्यासाठी, जे शेती आणि शेतीच्या क्रियाकलापांचा एक महत्त्वपूर्ण भाग आहेत.


पोळ्याच्या पूर्वसंध्येलाच बैलांची स्वच्छता स्नान व सजावटीची कामे सुरू होतात पोळ्याच्या दिवशी बैलांच्या पाठीवर रंगरंगोटी व नक्षीकाम करून त्यांच्यावर झूल पांघरली जाते. त्यांच्या गळ्यात घुंगरांच्या माळा, नवी वेसण, कासरा, पायात तोडे आदी आभूषणे घातली जातात. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. गावोगावी बैलांची मिरवणूक काढण्यात येऊन मारुतीच्या दर्शनासाठी त्यांना नेले जाते. घरी आणल्यानंतर बैलांचे औक्षण, पाद्यपूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.


यावेळी सागर काळंगे,प्रमोद सकुंडे,यमाजी पवार,संभाजी काळंगे,रमेश काळंगे,गणेश काळंगे,दीपक काळंगे,सुभाष पवार,बारकू पवार,संकेत शिंदे,रवींद्र पवार,प्रवीण शिंदे,

बापूराव पवार,शांतीलाल काळंगे आदी शेतकरी उपस्थित होते.

Related Post