शिक्षक - सामाजिक अभियंता ..

संघर्षनामा वृत्तसेवा lश्रीगोंदा 

दि.५सप्टेंबर २०२४

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. गुरु हा शिष्यास योग्य मार्ग दाखवून शिष्याची प्रगती घडवतो. ज्याप्रमाणे कुंभार मातीला सुबक आकार देऊन त्याचे सुंदर मडके बनवतो तसाच गुरु शिष्याच्या जीवनास सुबक आकार देऊन शिष्याच जीवन यशस्वी बनवतो.शिक्षक हे गुरुच असतात. ज्याप्रमाणे अभियंता सुंदर घरे बांधतो त्याप्रमाणेच शिक्षक हा सुसंस्कृत पिढी घडवण्याचे कार्य करत असतो. शिक्षक वर्गातुन भारताचे भविष्य घडवत असतो.5 सप्टेंबर रोजी सर्वत्र शिक्षक दिन उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त हा लेख. शिक्षक नेहमीच आदर्श समाज घडवण्याचे कार्य करत असतो. आपले वि‌द्यार्थी जीवनात यशस्वी व्हावेत म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करत असतो. विद्याथ्र्याना अध्ययन बरोबरच शिस्त, चारित्र्याचे धडे शिक्षक स्वकृती मधून देत असतो. कधी कठोर तर कधी कौतुकाची थाप टाकत शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात. आजही अनेक विद्यामंदिर संस्कार केंद्रे बनली आहेत. काळ्या फळ्यावर पांढ-या खडूने शिक्षक भावी आदर्श समाजाचे भविष्य घडवत असतो. शिक्षक या शब्दातच शिक्षकाचे महत्व अधोरेखीत होतेय. शि- शीलवंत क्ष- क्षमाशील क- कलावंत.


आज काळानुरूप शिक्षण व्यवस्थेत खूप बदल होताना दिसतात. आज शिक्षकांची छडी हरवलेली आहे.शिक्षण क्षेत्रात गुणांचा 

 महापुर वाहताना दिसतोय. शिक्षकांना अनेक शाळाबाह्य कामे दिली जातात. अनेक शाळेत गुणवत्ता वाढावी म्हणुन परीक्षेत कॉफीचा वापर केला जातोय. अनेक शिक्षण संस्थेत प्रवेशासाठी स्पर्धा दिसून येतेय. शिक्षकांचे भविष्य विना अनुदान शब्दाने उध्दवस्त होताना दिसतय. खरंतर आज पुन्हा गरज आहे संस्कारक्षम विदया मंदिरांची. आज अनेक विद्यालय व शिक्षक हि गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम शिक्षण देण्याचे कार्य प्रामाणिकपणे करत आहेत. शिक्षक दिन निमित्त शिक्षकांना त्यांच्या पावित्र कार्यासाठी खुप शुभेच्छा.


लेखक - प्रा. महेंद्र मिसाळ 9850392414 ( सुप्रसिध्द वक्ते व लेखक)

Related Post