भारतीय जवान किसान पार्टीच्या राज्य कार्यकारीणीच्या निवडी जाहीर

संघर्षनामा वृत्तसेवा l नगर 

दि.२ सप्टेंबर २०२४

प्रतीनिधी,

भारतीय जवान किसान पार्टी महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणीची राज्य स्तरीय निवड व आढावा बैठक अहिल्यानगर येथे  खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली. 

यामध्ये महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यातील असंख्य आजी माजी सैनिक,शेतकरी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. 

लवकरच अहिल्यानगर येथे मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ एक लाख सैनिक,अर्धसैनिक,शेतकरी,व्यापारी व विद्यार्थी यांचा भव्य जनसंपर्क मेळावा घेण्यासंबंधी आढावा बैठकमध्ये चर्चा झाली त्याबाबत तारीख निश्चीत झालेवर कळवण्यात येणार आहे.

या बैठकी मध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे व प्रदेशाध्यक्ष मेजर अंकुश खोटे यांनी कार्यकारणीच्या पदाची सर्वानुमते घोषणा करताना अराजकीय कोर कमिटीची स्थापना करण्यात आली असुन सर्वानुमते जेष्ठ विचारतज्ञ जगन्नाथ खामकर अध्यक्षपदी , उपाध्यक्षपदी भीमराज आरेकर, सचिव पदी पद्माकर चंदनशिवे, सदस्यपदी बाबासाहेब तिडके, प्रशांत भगत,शिवाजी नांदखिळे यांची  निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक चौधरी हे असून त्या साठी मेजर शिवाजीराव पालवे यांनी अनुमदन केले.

पुढील निवडी जाहीर करताना महाराष्ट्र पॅरा मिलिटरी प्रदेशाध्यक्ष पदी मेजर निळकंठ उल्हारे ,राज्यसचिव हनुमान झगडे,महिला प्रदेशाध्यक्ष जयश्री महेंद्र पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष समीर खानोळकर, यांना नियुक्ति देण्यात आली.

जिल्हा बांधणी करताना अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, अकोला जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर हातोडकर,जालना जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे, सातारा जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, जालना जिल्हा सचिव गफार पठाण, यांची निवड करुन कार्यभार सोपवण्यात आला. 

      यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे यांनी  माध्यमांशी बोलताना सांगितले की  महाराष्ट्रामध्ये जे तोडा फोडीचे राजकारण सुरु आहे त्याला पूर्णपणे आळा बसायचा असेल तर भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या समवेत प्रहार जनशक्तीचे बच्चुभाऊ कडू, स्वराज्याचे संभाजी राजे भोसले व भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी झाल्यावरच अगदी त्रस्त झालेल्या जनतेला मोठा आधार मिळणार आहे. या दूषित राजकारणाला सुयोग्य पर्याय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातले स्वराज्य स्थापन करायचे असेल तर आपण सर्वांनी वज्रमूठ करुन  जनतेसमोर जावे लागणार आहे. आपली ठोस आणि निर्णायकभूमिका दिसत असल्याने  महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने जाहीर पाठिंबा मिळत आहे.

 यावेळी महाराष्ट्र राज्य पॅरामीटरी प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेले मेजर निळकंठ उल्हारे यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितले की, भारतीय सेनेला संपूर्ण देशात ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या सर्व सुविधा सर्वच अर्धसैनिकांनाही मिळणे काळाची गरज असुन त्याकामी राज्यातील आजी माजी अर्ध्य सैनिक परिवारांनी एकजुटीने पार्टीत सामिल होण्यासाठी पुढे यावे आणि सर्वांनी भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवून जास्तीत जास्त सभासद नोंदणीसाठी अवाहन केले.

 या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातुन शेकडो शेतकरी,सैनिक अर्धसैनिक, महिला भगिनी उपस्थित होत्या सर्वांचे आभार बबन दहिफळे व मारुती ताकपेरे यांनी मानले.

Related Post