इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल ला अतिउत्कृष्ट व अतिउत्तम श्रेणी प्रदान 

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

दि.२५जुलै २०२४


 लिंपणगाव ( प्रतिनिधी)--श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे इंदिरा गांधी पॉलिटेक्निक, बेलवंडी शुगर चे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३/२०२४ करिता बाह्य अवेक्षण समिती तर्फे झालेल्या तपासणी मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखांना  Excellent श्रेणी व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल या शाखांना Very Good श्रेणी प्रदान करण्यात आली. सदर समितीने महाविद्यालयास भेट दिली व महाविद्यालयाचे कामकाज व सुविधांची तपासणी करून ही श्रेणी प्रदान केली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री राजेंद्र दादा नागवडे, व्हाईस चेअरमन श्री बाबासाहेब भोस, एडीसीसी बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे सर्व सन्माननीय संचालक मंडळ,सचिव श्री बापूराव नागवडे, निरीक्षक श्री सचिनराव लगड सर यांनी प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री प्रशांत भोईटे सर, अकॅडमीक कॉर्डिनेटर प्रा. संदीप नातु ,विभाग प्रमुख श्री हवालदार ए आय, श्री इथापे पी एस व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या साठी परीश्रम घेतले.

Related Post