जनता विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

दि.२१ जुन २०२४

लिंपणगाव प्रतिनिधी,

आज जनता विद्यालय काष्टी येथे गुरुपौर्णिमा  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पंडित घोंगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी कऱण्यात आली.यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी छान पद्धतीने नियोजन केले होते. या विद्यालयाचे प्राचार्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते,  विद्यालयातील सर्व गुरुजनांचा सत्कार दहावीच्या विद्यार्थ्यांनी केला.   प्राचार्य व सर्व गुरुजनांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मी वहिनींच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यालयातील 5 वी ते 10 वी विद्यार्थ्यांनी भाषणे केली. सौ. जाधव मॅडम यांनी शिक्षक मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्मिक व प्रबोधनपर भाषण केले. यावेळी श्री शिंदे एच.पी. प्राध्यापक काळंगे सर ,श्री तोरडमल सर आदींनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमे विषयी माहिती सांगितली. अध्यक्षीय मनोगतात विद्यालयाचे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांनी गुरूंचा नेहमी आदर करून आपण ज्ञान संपादन करावे असा संदेश दिला.अर्सलान शेख व हर्षवर्धन भोसले  यांनी सूत्रसंचालन केले.वेदांत कोकाटे यांने आभार मानले. सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात उत्साहात पार पडला.

Related Post