नागवडे इंग्लिश मीडियम मध्ये मातृ पितृ पूजन संपन्न.

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

दि.२१जुलै २०२४

प्रतिनिधि,

भारतीय संस्कृतीमधील गुरु शिष्याचे नाते विशद करणारा महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा श्रीकृष्ण-सांदीपणी, गुरुद्रोण-अर्जुन, मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथ, रमाकांत आचरेकर-सचिन तेंडुलकर अशी कित्येक उदाहरणे या निमित्ताने देता येतील.विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचा, गुरूंचा, शिक्षकांचा आदर सन्मान करावा त्यांच्या प्रति आदराची भावना वाढीस लागावी या उद्देशाने शिवाजीराव नागवडे डेफोडील्स स्कूलमध्ये गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून मातृ पितृ पूजन उत्साहात संपन्न झाले.


सलग दोन दिवस संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नागवडे कारखान्याचे संचालक सुभाष काका शिंदे, ज्ञानदीप ग्रामीण विकास संस्थेचे निरीक्षक बी.के. लगड यांनी भूषविले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना विद्यार्थी राष्ट्राचे आधारस्तंभ असल्याचे सांगत एखादा यशस्वी व्यक्ती घडत असताना त्या व्यक्तीमागे गुरूंचे, आई-वडिलांचे असणारे परिश्रम महत्त्वाचे असल्याचे बी.के.लगड यांनी सांगितले.


प्रसंगी विद्यार्थ्यांनी गोरक्षनाथ जन्म देखावा सादर केला. याद्वारे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या गुरु शिष्य देखाव्याद्वारे भारतीय संस्कृतीमध्ये असणारे गुरु शिष्यांचे विश्वासाचे नाते दर्शविण्यात आले.यावेळी छत्रपती शिक्षण संस्थेचे निरीक्षक सचिन लगड, रुपेश इथापे, भापकर मॅडम, कसबे सर, रामदास वाळके, प्रो. प्रियंका लगड यांनी मनोगत व्यक्त करून शाळेने मातृ पितृ पूजनाचा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शालेय प्रशासनाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.


यावेळी नागवडे कारखान्याचे माजी संचालक मुरलीधर भोस, उद्योजक सुनील ढवळे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरीक्षक एस. पी. गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता भोईटे, प्रियंका नागवडे यांच्यासह इयत्ता ९ वी च्या विद्यार्थिनींनी केले.

Related Post