श्री व्यंकनाथ विद्यालयाकडून दिंडी सोहळ्याचे आयोजन.

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

दि.१६जुलै.२०२४

लिंपणगाव( प्रतिनिधी )-आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री व्यंकनाथ विद्यालयाकडून दिंडी सोहळ्याचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा 16 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थी व शिक्षकांनी पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची संपूर्ण गावातून मिरवणूक काढत. हातात भगवे झेंडे पताका घेऊन या पालखीचे श्री व्यंकनाथ मंदिरात आगमन झाल्यानंतर सदर मंदिरात श्री हंगेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी व विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक ज्ञानदेव धायगुडे यांची कन्या ह भ प संचिता धायगुडे हिचे प्रवचन आयोजित करण्यात आले.


   यावेळी आपल्या प्रवचनरुपी सेवेत ह भ प संचिता धायगुडे यांनी धार्मिक दृष्ट्या भरीव मार्गदर्शन करत संत नामदेव महाराजांचा अभंगाचा आधार घेत म्हटले आहे की; संत नामदेव महाराजांचा अधिकार सांगताना त्या म्हणाल्या की; संत नामदेव महाराजांनी कपड्यांचा व्यापार करताना एका दगडाला साक्षी मानून कपडे दिले. व साक्षीदार म्हणून तो दगड आपल्या घरी घेऊन गेले व त्या दगडाला म्हणाले हे गणोबा आमच्या कापडाचे पैसे द्या; काय? आश्चर्य दगडच सोन्याचा झाला. संत नामदेव महाराजांनी लोटांगण घालतात आणि म्हणतात हे देवा मी तुझे चरण वंदिन डोळ्याने तुझे रूप पाहिलं. असे उद्भवतीत करत त्यांनी उपस्थित विद्यार्थी मान्यवर व ग्रामस्थांना सल्ला देत म्हणाल्या की सर्वांनी पांडुरंगावर नितांत विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. सतत मुखातून भगवंताचे प्रत्येकाने नामस्मरण करावे निश्चितच ईश्वर प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. असे सांगत विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. 


        या दिंडी सोहळ्यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विठ्ठल रुक्मिणीचे रूप धारण करत मोठा सहभाग घेतला. या दिंडी सोहळ्यामुळे लोणी व्यंकनाथ मध्ये पंढरीचे स्वरूप दिसून आले. या दिंडी सोहळ्यानंतर विद्यालयाने देखील विद्यार्थ्यांना गोड महाप्रसादाचे वाटप केले‌ या प्रवचन रुपी सोहळ्यास राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नहाटा; गावच्या सरपंच मनीषाताई नहाटा; नागवडे कारखान्याचे माजी संचालक विलासराव काकडे; माजी सभापती गणपतराव काकडे; स्कूल कमिटीचे सदस्य उत्तमराव लगड; सामाजिक कार्यकर्ते श्री नलगे तात्या; प्राचार्य आनंदा पुराने सर यांच्यासह विद्यार्थी; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Post