मा.सुभेदार मेजर जगन्नाथ खामकर यांचे अनमोल विचार..!

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

दि.१६ जुलै २०२४

प्रतिनिधि,

** अनमोल विचार**

परमेश्वरांनी तीन गोष्टी सर्वांना एकसमान दिलेल्या आहेत.

वेळ, परिश्रम आणि बुद्धी

आपण या तिन्ही गोष्टींचा योग्य समन्वय साधला तर आपले लक्ष लवकर साध्य करू शकता.

1. बुद्धीचा योग्य वापर करून जर परिश्रम केले तर तुम्ही तुमचे ध्येय लवकर प्राप्त करू शकता.

2. योग्य दिशेने कार्य करा, जर तुमची दिशा चुकली तर तुम्हाला काहीही साध्य करता येणार नाही.

3. दिशा योग्य असेल तरच  तुमची प्रगती होऊ शकेल.

4.  दिशा चुकली तर तुमची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही.

5. मैत्री ही अश्रूसारखी असावी. सुखामध्ये आणि दुःखामध्ये एक सारखीच साथ देणारी.

6. मैत्रीमध्ये फक्त एक दुसऱ्याला जीव लावायचा असतो.

7. मैत्री अशी करा मित्रवर्य...!! की तिचा शेवट कधीही होणार नाही.

8. कुणाची ही निंदा व आलोचना करू नका.  कारण नसताना ही कुणाची निंदा करणे जरुरी आहे काय?

9. तुम्ही कुणाला  मागितल्या बिगर सल्ला तर देत नाही ना?

10. लक्षात ठेवा ...!! ज्यांना तुम्ही सुधरायला जाल तोच तुमचा जास्त शत्रू बनेल.

11. सर्वांनाच सुधरायाचा ठेका घेऊ नका.

12. प्रशंसा करायची आहे ना? सर ती सर्वांच्या समोर करा आणि आलोचना करायची असेल तर ती एकटे असल्यावर करा.

13. कोणाचीही वारंवार आलोचना करीत राहू नका, नाहीतर एक दिवस तुम्ही त्यांना चांगला सल्ला दिला तरी  ते मानणार नाहीत.

14. प्रत्येकाच्या यशस्वीयतेची सीमा अलग अलग असते. म्हणून त्यांना त्यांच्या सीमेपर्यंतच सुधारले जाऊ शकते. हे लक्षात ठेवा.

15. ज्यादा बोलणे टाळा, व जास्त ऐकायला शिका अशा वागण्यामुळे तुमच्यामध्ये जास्त परिपक्वता येते.

                      --------------++++------------

Related Post