श्रीगोंदा तालुक्यातील महिलेचा सातारा नजीक खून,दोन आरोपी जेरबंद...

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदा 

दि.६जून २०२४

प्रतिनीधी,

 श्रीगोंदा तालुक्यातील महिला गायब असल्याची नोंद श्रीगोंदा पोलीस स्टेशन मिसिंग रजिस्टर नुसार ५१/ २०२४ प्रमाणे दाखल असून या अनुषंगाने पोलीस तपासाची चक्रे गतिमान असताना त्या महिलेच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारावर तांत्रिकदृष्ट्या तपास करताना नामे राजेंद्र देशमुख राहणार मुंढेकरवाडी ता. श्रीगोंदा,बिभीषण सुरेश चव्हाण राहणार बाबळगाव तालुका इंदापूर यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी भयानक कबुली दिली. सदर मिसिंग महिलेचा सातारा नजीक खून करून तिला कॅनॉल च्या पाण्यात टाकून दिल्याचे सांगितले.

 अधिकच्या माहितीनुसार सदर महिलेबाबत कोरेगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर २४५ /२०२४ भा द वी कलम३०२/२०१ प्रमाणे दाखल आहे याबाबत दोन्ही संशयित इसमांना कोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास चालू आहे.

Related Post