अलकाताई दरेकर यांनी सुसंस्कृत व गुणवंत विद्यार्थी घडविले-प्रा-सचिनराव लगड

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे

दि.३जून २०२४

 लिंपणगाव (प्रतिनिधी )-पारगाव सुद्रिक येथील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर यांनी सेवेत असताना अनेक सुसंस्कृत व गुणवंत विद्यार्थी घडवत शिक्षणक्षेत्रात भरीव योगदान दिल्याचे गौरदगार व्यंकनाथ विद्यालयाचे प्रा. सचिनराव लगड यांनी व्यक्त केले.


     मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर या प्रदीर्घ सेवेतून नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. त्या प्रित्यर्थ प्रा. लगड व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी त्यांचा त्यांच्या निवासस्थानी सन्मान केला. यावेळी आपल्या गौरवोद्गारपर भाषणात प्रा. लगड पुढे म्हणाले की; श्रीमती अलकाताई दरेकर यांनी श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षण महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी स्थापन केलेल्या आदर्श शिक्षण संस्था म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेत जवळपास गेली 35 वर्ष उपशिक्षक म्हणून काम पाहत असताना श्रीमती दरेकर यांनी अत्यंत प्रभावीपणे ज्ञानदानाचे कार्य पार पाडले. शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचे काम करत असताना विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून वेळोवेळी ज्यादा तासाच्या माध्यमातून गणित विषयाचे विद्यार्थ्यांना भरीव ज्ञान देण्याचा प्रयत्न श्रीमती दरेकर यांनी केला. विशेष म्हणजे विद्यालयाचे उत्तम प्रशासन सांभाळल्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणात्मक दृष्ट्या वाढ झालेली दिसते. असे सांगून प्रा. लगड आणखी पुढे म्हणाले की; मुख्याध्यापिका म्हणून श्रीमती दरेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम शालेय शिस्तीला अधिक महत्त्व दिले. त्याचबरोबर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या गोरगरीब शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांसाठी शाळा अंतर्गत अनेक विविध उपक्रम राबवून विद्यालयाचे अनेक विद्यार्थी जिल्हा व राज्य पातळीवर चमकले. त्यातून संस्था व विद्यालयाची मान उंचवली गेली आहे. असे सांगून प्रा. लगड आणखी पुढे म्हणाले की; श्रीमती दरेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे अधिक लक्ष देऊन उत्कृष्ट प्रशासन सांभाळण्यामध्ये श्रीमती अलकाताई दरेकर यशस्वी झाल्या. असे सांगून लगड यांनी श्रीमती दरेकर यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.


      यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी देखील मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई दरेकर यांच्या शैक्षणिक कार्याविषयी बोलताना दहा वर्षे एकत्र काम करत असताना श्रीमती दरेकर मॅडम यांची कामाची पद्धत अत्यंत प्रशंसनीय होती शिक्षण क्षेत्रात उत्तम अध्यापनाचे काम पाहत असताना अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. त्याचे श्रेय निश्चितच दरेकर मॅडम यांच्याकडे जाते. असे सांगून श्रीमती दरेकर मॅडम यांनापुढील दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ पत्रकार कुरुमकर यांनी सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी त्यांचे पुत्र अक्षय अनभुले उपस्थित होते.

Related Post