संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . ७डिसेंबर २०२५
प्रतिनिधी ,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढोरजे येथे शिक्षक विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला .यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने बाजार भरवण्यात आला होता. यावेळी माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री दळवी सर यांनी सर्वांचे स्वागत केले. गवळी मॅडम यांनी प्रास्ताविक केले, तसेच तनपुरे मॅडम व गायकवाड मॅडम यांनी शाळेच्या शैक्षणिक ,भौतिक धोरणाविषयी चर्चा केली, जठार मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या हातावर टॅटू काढून सजावट केली,श्री नलगे सर यांनी शाळेमध्ये चालता बोलता हा कार्यक्रम घेऊन सदरील कार्यक्रमात चांगल्या प्रकारची रंगत वाढवली. जाधव मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी गावातील सर्व आजी-माजी सरपंच, चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्था संचालक तसेच काशी विश्वनाथ देवस्थानचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. श्री काशी देवस्थानच्या वतीने शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या खेळ साहित्य व इतर उपयोगी वस्तूसाठी एक लाख रुपये देण्याचे ठरले. तसेच गावातील अनेक मान्यवरांनी एकत्र येऊन शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू तसेच साहित्य देण्याचे मान्य केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी नव्याने मंजूर झालेल्या वर्ग खोल्यांचे काम ही यावेळी चालू करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने व जनरल नॉलेजची माहिती असावी यासाठी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेमध्ये ग्रंथालय चालू करण्याचे ठरले, यासाठी सर्व शिक्षक व पालकांनी मदत करण्याचे आश्वासन दिले.गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन शाळेचा कायपालट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.