शिरुर श्रीगोंदा एसटी बसच्या फेऱ्या कमी केल्याने प्रवासांचे सोमवार 15 डिसेंबर रोजी धरणे आंदोलन

संघर्षनामा वृत्तसेवा lश्रीगोंदा 

दि. ९ डिसेंबर २०२५

प्रतिनिधी,

 श्रीगोंदा ते शिरूर व शिरूर ते श्रीगोंदा एसटी बस वेळेवर येत नसल्याने तसेच बसच्या फेऱ्या कमी केल्याने या मार्गावरती दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवासांच्या वतीने सोमवार दिनांक 15 डिसेंबर 25 रोजी श्रीगोंदा आगारसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन श्रीगोंदा आगारातील अधिकाऱ्यांना देण्यात आले. बेलवंडी ते शिरूर रस्त्याचे काम चालू असल्याचे कारण सांगून काही फेऱ्या श्रीगोंदा आगाराने कमी केले आहेत. तसेच सदर रस्त्याचे काम चालू असल्यामुळे होणारी खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे त्यामुळे प्रवाशांना बस शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही फेर्‍या कमी केल्यामुळे व श्रीगोंदा आगाराच्या अनागोंदी कारभारामुळे कधी कधी दोन ते तीन तासापर्यंत कुठलीही बस येत नाही. याउलट कधी कधी एका पाठीमाग एक तीन ते चार बस धावताना दिसतात त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. सदर मार्गावरती अनेक विद्यार्थी शिरूर बेलवंडी श्रीगोंदा या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यांना शाळेत जाण्यासाठी व परत येण्यासाठी उशीर होत आहे. बसच्या फेऱ्या कमी केल्याने बस मध्ये खूपच गर्दी होत आहे बऱ्याच वेळात वाहक बस स्टॅन्ड वरील थोडेच प्रवासी बस मध्ये घेऊन दरवाजे बंद करतात यामुळे बऱ्याच वेळा या मार्गावर वाद निर्माण होत आहेत. बस मध्ये होत असलेल्या गर्दीमुळे चोरी होणे त्याचबरोबर ढकलाढकली येणे याचे प्रमाण वाढत आहेत मागील पंधरा दिवसांपूर्वी एका प्रवासी मुलीचा बस मध्ये चढताना ढकलाढकलीमध्ये हात मोडला असून त्यावरती श्रीगोंदा आगाराने कुठलेही उपयोजनात न करता ते आमच्या अखत्यारीत येत नाही अशी उत्तर आगार प्रमुख ढवळे साहेब यांनी दिली. शिरूर वरून श्रीगोंदा कडे निघणारी शेवटची बस बऱ्याच वेळा नऊच्या दरम्यान निघते सध्या प्रत्येक गावामध्ये बिबट्याची वावर जास्त वाढलेला असल्यामुळे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

 *प्रमुख मागण्या* 

1. प्रत्येक 30 मिनिटांनी श्रीगोंदा ते शिरूर बस श्रीगोंदा आगारामधून सोडण्यात यावी.

2. पहिल्या सहा फेऱ्या पंधरा मिनिटांनी सध्याच्या वेळेपेक्षा लवकर सुरू कराव्यात.

3. एका पाठोपाठ एक धावणाऱ्या बसचे व्यवस्थित नियोजन करून हे अंतर तीस मिनिटं असे राखले जावे.

4. सध्या सर्वत्र बिबट्याची भीती व वावर असल्याने शिरूर ते श्रीगोंदा शेवटची बस ही वेळेमध्ये म्हणजे साडेसात वाजता शिरूर वरून सोडण्यात यावी.

5. या मार्गावर बऱ्याच वेळा बस फेल होतात कारण त्या जास्त जुन्या असतात म्हणून चांगले स्थिती च्या बस या मार्गावर सोडण्यात यावे.

6. वाहक बऱ्याच वेळा प्रवाशांशी वाद घालतात व बस पोलीस स्टेशनला.

नेण्याचे धमक्या देतात त्यांना आपण योग्य ते सूचना कराव्यात.

 7. आपल्या आगाराच्या चौकशी विभागातील 02487 222338 हा क्रमांक नेहमी बंद असतो तो सुरू करण्यात यावा.

 वरील मागण्या मान्य न झाल्यास सोमवारी 15 डिसेंबर रोजी श्रीगोंदा आगारांसमोर धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष संतोष जठार, संदीप हिरडे, प्रमिला दीक्षित, ऋतुजा परदेशी, बेलवंडीच्या सामाजिक कार्यकर्त्यां स्वाती देशमुख, सहारा सर्वांगींचे अध्यक्ष संतोष भोसले, अनिकेत घोडके, शितल खेडकर, भारती काळे, शुभम दळवी, केशव कातोरे, शुभांगी हिरवे, महेश सूर्यवंशी, ऋतुजा ओहोळ, दत्ता शेलार यांनी दिला आहे

Related Post