श्री तांदळेश्वर माध्यमिक विद्यालयातील उपक्रमांचे कौतुक

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . १५ डिसेंबर २०२५

प्रतिनिधी,

काष्टी -श्रीगोंदा तालुका ग्रामीण विकास व शिक्षण संस्था, काष्टी संचलित श्री तांदळेश्वर माध्यमिक विद्यालय, तांदळी दुमाला येथे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व उपक्रमशील कार्यक्रमांची तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.क्षीरसागर सर व ज्येष्ठ शिक्षक श्री. देवराम दरेकर सर यांनी दिली.

या प्रसंगी अहिल्यानगर माध्यमिक संघाचे सचिव तसेच श्री रामेश्वर विद्यालय, चिखलीचे मुख्याध्यापक श्री. रमजान हवालदार, श्रीगोंदा तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष श्री. देविदास खेडकर, श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भास्कर जगताप, श्री. सतीश गांजूरे सर, श्री. शिवाजीराव नागवडे सर, अनिल घुटे साहेब, श्री. गायकवाड सर व श्री. गिरमकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यालयात राबविण्यात येणारे अध्ययन–अध्यापनातील नाविन्यपूर्ण उपक्रम, विज्ञान विषयक उपक्रम, मार्गदर्शन वर्ग, सराव परीक्षा व इतर उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी निश्चितच फायदेशीर असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. असे उपक्रम इतर विद्यालयांनीही राबवावेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी श्री. रमजान हवालदार सर यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासाचे महत्त्व सांगून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Related Post