संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.९ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी,
श्रीगोंदे तालुक्यातील श्री शिवाजीराव नागवडे विधी महाविदयालय तसेच श्रीगोंदा वकील श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी ॲड ए यु पठाण यांची निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभ तसेच नवोदित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम अनुराधा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले .
प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ अंजुला चौबे यांनी महाविद्याल्याबद्दल माहिती देत असताना विद्यार्थी संख्या चांगली असुन सर्व विद्याथ्यार्थी ज्ञान घेत विविध उपक्रमामध्ये उत्स्फुर्त सहभागी होतात .
याप्रसंगी बोलताना पठाण म्हणाले . शेतकरी कुटूंबातून फार प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतले माणूस कष्टाने मोठा होतो जिद्दीने शिकले पाहिजे नेहमी आशावादी असावे कायदा सरळ सोप्या भाषेत सांगता येईल त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे . शिक्षकाने विद्यार्थ्यांना एखादी संकापना समजत नसेल तर ती पुन्हा पुन्हा शिकवली ल पाहिजे या मताचा मी आहे . ही उदयाच्या काळाची गरज आहे चारित्य संपन्न लोक न्याय संस्थेत यायला पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले . श्रीगोदया सारख्या सधन तालुक्यात दोन विधी महाविदयालय आहेत हे फार गौरवशाली गोष्ट असाऱ्याचे त्यांनी नमूद केले . विद्यार्थ्यांना फार चांगले मार्गदर्शन मिळाले . त्याबद्दल विद्यार्थ्यां मध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते . सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभावे अशी भावना व्यक्त केली .
यावेळी ॲड प्रसाद इंगळे अध्यक्ष श्रीगोंदा वकील संघ ॲड अशोक रोडे, ॲड अशोक वाळुंज ,ॲड जयंत शिंदे . ॲड नानासाहेब गायकवाड ,ॲड बापूसाहेब भोस, ॲड दत्तात्रय जऱ्हाड ॲड संदीप कावरे , दिग्विजय राजेंद्र नागवडे , डॉ अंजुला चौबे प्राचार्य श्री शिवाजीराव नागवडे विधी महाविदयालय ,अमोल नागवडे , सुर्यभान गोलांडे ,प्रा ॲड .साक्षी प्रथमशेट्टी, ॲड पुरुषोत्तम फाटे आदीसह बहुसंख्य वकील व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा ॲड रुपाली गोळे यांनी तर अनुराधा नागवडे यांनी आभार मानले .