संघर्षनामा वृत्तसेवा श्रीगोंदा
दि .११ डिसेंबर २०२५
श्रीगोंदा प्रतिनिधी ,
श्रीगोंदा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित श्रीगोंदा च्या पदाधिकारी निवडीची सभा मंगळवार दिनांक ९/१२/२०२५ रोजी , मा श्री नारायण परजणे सहायक निबंधक सह संस्था श्रीगोंदा यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी चेअरमन पदासाठी श्री सुनिल शिवराम बोरूडे यांचे नावाची सुचना श्री डांगरे मोहन हरिभाऊ यांनी मांडली तर सौ.खेतमाळीस ज्योती हेमंत यांनी अनुमोदन दिले.
व्हा चेअरमन पदासाठी श्री उदमले हनुमंत धोंडीबा यांच्या नावाची सुचना औटी सखाराम दशरथ यांनी मांडली तर श्री नन्नवरे अनिल जगन्नाथ यांनी अनुमोदन दिले.
चेअरमन पदासाठी श्री सुनिल बोरुडे व व्हा.चेअरमन पदासाठी श्री हनुमंत उदमले यांच्या एकमेव नावांची सुचना आल्याने चेअरमनपदी श्री सुनिल बोरुडे व व्हा चेअरमन पदी श्री हनुमंत उदमले यांची निवड झाल्याचे सहाय्यक निबंधक श्री नारायण परतणे यांनी घोषीत केले.या निवडी मध्ये सहाय्यक निबंधक कार्यालयातील श्री निलेश मुंढे साहेब यांनी व संस्थेचे सचिव श्री राजूशेठ यांनी मदत केली तर निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक श्री नारायण परजणे यांनी चोख पार पाडली .
याप्रसंगी संस्थेचे संचालक श्री अशोक आळेकर, बापुराव सिदनकर, सुभाष बोरूडे,राजूदादा गोरे, पोपटराव कोथिंबीरे,सौ मंदाकिनी वडवकर संस्थेचे माजी चेअरमन श्री पोपटराव बोरूडे, जगन्नाथ औटी, कालिदास खेतमाळीस, सुर्यकांत वडवकर, आदी सह सभासद व नागरिक उपस्थित होते.