ज्ञानेश्वरी तील ओवी यायला अख्खे आयुष्य लागेल -हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर .

संघर्षनामा वृत्तसेवा lश्रीगोंदा 

दि.२० डिसेंबर २०२५

प्रतिनिधी,

कन्हैय्या परिवाराचे संस्थापक दिवंगत शांताराम लंके यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित भव्य किर्तन सेवा संपन्न झाली.

कन्हैय्या परिवाराचे संस्थापक दिवंगत शांताराम लंके यांच्या योगदाना मुळे हा किर्तन महोत्सव सुरू झाला , त्यांच्या लंके पाटील परिवारा ला कधी ही काहीही कमी पडणार नाही , असे गौरवोद्गार कन्हैय्या भव्य किर्तन महोत्सवात दुसरे पुष्प गुंफताना प्रसिद्ध समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी काढले .

   हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर म्हणाले की , वारकरी संप्रदाया चा पाया ज्ञानदेव , कळस नामदेव , पृथ्वी मध्ये पंच भूते आहेत , तसे ५ संत . या जगाला सुखी होण्यासाठी आईवडील , संत , भगवंत हवे आहेत . नदी परोपकारी , झाडे निस्वार्थी , आईवडील , संत , भगवंत निस्वार्थी , जगातला प्रत्येक माणूस नावासाठी जगतो . जगातील जे संत झाले , त्यातील ४० टक्के संत हे लोकांनी केले . मान्यता , धन्यता , विधवता वेगळ वेगळी आहे . आमदार , खासदार ही मान्यता आहे , तर संतामध्ये विधवत्ता आहे . चंद्र , सूर्य आहे , तो पर्यंत मान्यता आहे . बायको मिळणे , हे धन्य आहे , मुलगा होणे , हे धन्य आहे का .

      या विश्वात जेवढे संत झाले , त्यातील संत ज्ञानेश्वर हे विश्वातील सर्वांत कोवळे बाळ होय . तर मांडी ही नामदेव होय . कंपनीतून सेवानिवृत्त होणे , म्हणजे सेवेस पात्र नाही . किर्तन ऐकण्यासाठी आलेले हे सर्व ज्ञानोबाची बाळं आहे . अख्या ज्ञानेश्वरी त पांडुरंग , ज्ञानेश्वरांचे नाव नाही . आई चे नाही . ज्ञानेश्वरी त ९ हजार ३३ ओ व्या , सव्वा लाख शब्द आहेत . ज्ञानेश्वरी तील एक ओवी यायला एक जन्म लागतो , ती कथा , कांदबरी नाही , हरिपाठ ज्ञानेश्वरी , भागवत , रामायण या कथा आहेत . या विश्वात हरिपाठाचा जो ग्रंथ आहे , तो सर्वांत मोठा ग्रंथ आहे . ज्ञानेश्वरांच्या समाधी च्या वेळी भगवंत ही रडले . आम्ही किर्तनकार नाही , तर पांडुरंगाचा निरोप देणारे गडी आहोत . मेल्यावर मोक्ष मिळतो की , नाही हा वादाचा विषय आहे . डॉक्टरला तर कधीच माहिती नाही . हसत हसत जगा , हा स्वर्ग , भजन करत करत जगा , हे वैकुंठ आहे , तर तरफडून मरा , हा नरक आहे . स्वर्ग , वैकुंठ , नरक ही मानवाने केलेली कल्पना आहे . काकडा व हरिपाठ केल्यावर मोक्ष मिळतोच . मोक्षाचा आनंद भजनात आहेच . प्रत्येक माणसाच्या राशीला शनिची साडेसाती असते , पैश्या ने सर्वच गोष्टी मिळत नाही , सगळ्याला माफी आहे , पण कर्माला माफी नाही , ते फेडावेच लागते .

      सत्ता, पैसा , गुंड शक्ती ने काहीही करू शकता , पण यांचा काळ बदला घेतो , कर्माला माफी नसते , पारनेर तालुक्याची सेवा ही वारकरी पंथातील सर्वांत मोठी आहे . श्री क्षेत्र पिंपळनेर येथून निळोबाराय यांनी दिंड्या सुरू केल्या . त्यांचे जीवन एवढे सोपे नाही , त्यांचे जीवनचरित्र वाचावे . किर्तनात गायक , वादक नसावे , किर्तनकार व त्यांची साथ संगत चुकते . अंगणातील ताकद व खिशातील पैसा संपला की , तुम्ही संपलात , तदनंतर कोणीच कोणाचे नसते . या जगातील माणसे नाव व पैसा यासाठी जगतात , कोणालाही वेळ नाही , माझ्या इतकी किर्तने केली नाही , वा फिरले ही नाही . या जगात कोणाला लवकर मरायचे त्याने खरे बोला . १०० मुलांमधील ९३ मुले दारू पितात .

             [ चौकट - 

    लंके पाटील परिवाराने या दुध डेअरी ला अत्यंत छान से कन्हैय्या हे नाव दिले , या डेअरीचे संस्थापक दिवंगत शांताराम लंके यांनी आयुष्यभर काळ्या आईची सेवा केली , त्यांनी एवढा मोठा खर्च करत हा मोठा अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत केला , त्यांना आयुष्यात काहीही कमी पडणार नाही . चांगल्या कर्माला चांगले फळ आहेच . ] 

           [ चौकट - 

    यु ट्युब वर मी आजारी असल्याची क्लिप दाखवली जाते , आजच्या दिवसातील माझे हे ३ रे किर्तन आहे . दोन पैशांसाठी माझे बरे वाईट टाकले जाते . मी अजून २ वर्षे जगणार आहे , २०२८ वर्षे पुर्ण करणार आहे . जर पैसेच कमवायचे असेल , तर माझ्याकडे मागा , अशी खरमरीत टीका केली . ]

    [ चौकट - 

    या दुसऱ्या पुष्पात हभप इंदुरीकर महाराजांनी वयात आलेल्या मुला - मुलांना मार्गदर्शन करत सध्याच्या परिस्थिती वर त्यांचे शाब्दीक बाण सोडत कान टोचले . ] 

यावेळी महानगर बँकेचे संचालक बबनराव लंके , कन्हैय्या परिवाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र लंके , उद्योजक शिवाजीराव लंके , सोमनाथ वरखडे , शांताराम कळसकर , खंडू म्हस्के , वसंतराव वांढेकर , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य कार्यकारी सदस्य सुरेश खोसे पाटील, कन्हैया परिवारातील कर्मचारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Post