राजेंद्र गारुडकर यांना तालुकास्तरीय कृतिशील विज्ञान शिक्षक पुरस्कार

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि ११ डिसेंबर २०२५

श्रीगोंदा प्रतीनिधी:-श्रीगोंदा तालुका गणित विज्ञान अध्यापक संघटना व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 53 वे तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव येथे संपन्न झाले. या प्रदर्शनामध्ये श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा ज्ञानदीप या विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री गारुडकर राजेंद्र साहेबराव यांना या वर्षीचा कृतिशील विज्ञान शिक्षक पुरस्कार स्मितल भैया वाबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी पंचायत समिती श्रीगोंदा गटशिक्षणाधिकारी कुसुम कुमारी कानडी मॅडम, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन सुभाष काका शिंदे, युवा नेते दिग्विजय राजेंद्रजी नागवडे, रयत उत्तर विभागीय अधिकारी श्री नवनाथ बोडखे साहेब इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

 त्यांच्या निवडीबद्दल नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय राजेंद्रजी नागवडे साहेब, संस्थेच्या अध्यक्षा सौ अनुराधाताई नागवडे वहिनी, संस्थेचे निरीक्षक आदरणीय बी. के.लगड सर,छत्रपती शिक्षण संस्थेचे निरीक्षक सन्माननीय सचिनराव लगड सर,विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंदकर सर श्री भापकर सर,ठाणगे सर,गणित विज्ञान अध्यापक संघ पदाधिकारी व सर्व सेवकवृंद, ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Related Post