श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्या रविवार २१ रोजी आयोजन .

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२० डिसेंबर २०२५

प्रतिनिधी,

पारनेर - राज्यात नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागृत श्री मळगंगा मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निघोज येथील श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी १० वाजता कार्याध्यक्ष वसंतराव कवाद यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र कुंड पर्यटक विसावा हॉल येथे होणार असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव शांतराम कळसकर यांनी दिली आहे .

    श्री मळगंगा देवी चा महिमा राज्यभर असून या देवीच्या दर्शनासाठी वर्षेभर भाविक भक्त मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेऊन नतमस्तक होण्यासाठी मोठ्या संख्येने निघोज नगरीकडे धाव घेतात . या श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची स्थापना १९८२ साली म्हणजे ४२ वर्षापूर्वी दिवंगत बाबासाहेब कवाद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली .

      या श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कार्याध्यक्ष वसंतराव कवाद यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि . २१ रोजी सकाळी १० वाजता श्री क्षेत्र कुंड पर्यटक विसावा हॉल येथे संपन्न होत असून या सभेत २५ डिसेंबर २०२४ या मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे , २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील ताळेबंद व जमा खर्चास मंजुरी देणे , याच सालातील लेखा परीक्षकांनी दिलेल्या अहवालाची नोंद घेणे , चालू २०२५ - २६ या सालातील लेखा परीक्षकांची नेमणूक करणे व ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर अध्यक्षांच्या परवानगीने चर्चा करणे , असे विषय घेण्यात आल्याची माहिती सचिव शांताराम कळसकर यांनी दिली आहे .

    या ट्रस्टचे १९ पुरुष व २ महिला , असे २१ विश्वस्त मंडळ असून ७ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत .


         [ चौकट - 

   जगाच्या पाठीवर ९ आश्चर्ये मानली गेली आहेत , त्यातील च हे निघोज येथील कुकडी नदी पात्रात अर्धा किलो मीटर परिसरात खडकामध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली रांजणखळगी हे १० वे आश्चर्य असून ईश्वरी सत्तेतून तयार झालेली ही शिल्पे विलोभनीय असून निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल त्यांना जगाच्या नकाशावर आणून संपूर्ण विश्वामध्ये भारताचा नावलौकिक वाढावा , या दृष्टीने श्री मळगंगा ग्रामविकास ट्रस्टच्या माध्यमातून निघोज व श्री क्षेत्र कुंड येथील एकूण ११ मंदिरांची दुरुस्ती व देखभालीची कामे करण्यात येत आहेत . ]  

   [ चौकट - 

    खासदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून ५ कोटी ३६ हजार ९५२ रुपयांची विविध कामे मंजूर झाले असून त्यामध्ये पालखी मार्ग नूतनीकरण , पर्यटक भोजन कक्ष , संरक्षण भिंत , पर्यटक विसावा केंद्र , श्री मळगंगादेवी परिसर सुशोभीकरण व इतर कामांचा समावेश आहे , यातील बरीचशी कामे पूर्ण त्याच्या मार्गावर असून श्री मळगंगा प्रसादालय , श्री मळगंगा भक्त निवास , श्री क्षेत्र कुंड पर्यटन स्थळ सुशोभीकरण , मळगंगा गार्डन मधील नाना नानी पार्क , स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अद्यावत अभ्यासिका , ही कामे पूर्ण करण्यात येऊन इतरही कामे प्रगतीपथावर आहेत . ]

Related Post