संघर्षनामा वृत्तसेवा lश्रीगोंदा
दि.९ डिसेंबर २०२५
प्रतिनिधी,
श्रीगोंदा येथील छावा ट्रेकिंग ग्रुपच्या १६० मावळ्यांनी कोयना धरणाचे सर्वात उंच बेट असलेल्या वासोटा किल्ल्याची मोहीम यशस्वी केली आणि किल्ल्यावर मावळ्यांनी मित्रांचे प्राण वाचविण्याच्या ह्रदयस्पर्शी भावनेने मी माझे अवयव दान व रक्तदान करणार अशी शपथ घेतली.
शनिवारी संध्याकाळी कोयना धरणाच्या कडेला बामनोली येथे कॅम्पेन टेंट स्टे केले रविवारी सकाळी ४५ मिनिटाच्या जल प्रवासानंतर व्याघ्रगड मोहीम करण्यासाठी घनदाट जंगलात पोहचले सुरुवातीला वाटले वासोटा किल्ला आम्ही सहज सर करु पण गड चढताना दमछाक झाली आणि मावळे जमीनीवर आले आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोष करु लागले आणि महाराजांना मानवंदना दिली
या मोहीमेत 1 वर्षाच्या रिया चंद्रकांत झरेकर पासून वय 67 वर्षीय ट्रेकर्स संभाजी लगड हे पत्नीसह सहभागी झाले हे ऊर्जा देणारे होते वनविभागाने परिसरात प्लास्टिक मुक्त चांगले काम केले हे भावुक वाटले असे नियोजन केले तर प्लास्टिक मुक्त किल्ले होऊ शकतात..
अवघड चढाई होती परंतु अत्यंत सुंदर असे नियोजनात ग्रुप वेळेवर यामोहीमेत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कॅप्टन अजिंक्य रहाणे यांचे वडील मधुकर रहाणे डॉ नितीन खामकर अनिल शिंदे स्मितल भैय्या वाबळे प्रा. शंकर गवते नवनाथ दरेकर सैनिक शाळकरी विद्यार्थी महिला सहभागी होते सैनिक संघटना श्रीगोंदा येथील हरी ओम योग ग्रुप दौड मित्र परिवराने मोहीमेची रंगत वाढविली .
या मोहीमेचे नियोजन छावाचे अध्यक्ष नवनाथ खामकर गोपाळराव डांगे, संतोष जाधव, विकी शिवले यांनी निस्वार्थ भावनेने केले.