संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.७ डिसेंबर २०२५
अहिल्यानगर(प्रतिनीधी) ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणुन सकल भारतीयांसाठी असह्य दुख्खाची आठवण करुन देणारा दिवस ठरतो. देशातील दिनदलीत बहुजनांच्या उत्थानासाठी त्यांच्या जिवणातील अज्ञानरुपी अंधार कायमचा दुर करण्यासाठी प्रतिकुल परिस्थीतीत उच्च शिक्षण घेत तब्बल बत्तीस पदव्या घेऊन अहोरात्र लढा देणारे संविधान नायक, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातुन सकल भारतीय नागरीकांना अनेक संविधानिक आधिकार दिले. देशाचे संविधान मानवी मुल्याचे रक्षण करते. ह्याच संविधानावर आजपर्यंत देश अग्रस्थानी राहुण मार्गक्रमण करत आहे.बाबासाहेबांनी शिका संघटीत व्हा व संघर्ष करा असा मुलमंत्र दिला.
अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड समोरील भव्यदिव्य पुतळ्यास सकाळपासुन अभिवादन करण्यास शहरजिल्ह्यातुन भिमसैनीकांचा मोठा जनसमुदाय लोटला होता. विवीध पक्षिय संघ, संघटनांच्या वतीने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी भिमरायांच्या पावण स्मृतीस विनम्र अभिवादन केले.त्या समयी शासनाचा साहित्यरत्न लोकशाहिर डॉ.अण्णा भाऊ साठे पुरस्कार विजेते सुनिल सकट व हिराताई गोरखे, शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार विजेेते राधेलाल नकवाल, माय भारतचे सत्यजित संतोष यांनी मार्गदर्शन केले.भारत सरकारचे नोटरी वकील महेश शिंदे,शाहु फुले आंबेडकर साठे कलाम विचार मंचाचे संस्थापक अशोक शिंदे सर, अनु.जा. मोर्चाचे शहराध्यक्ष संजय गायकवाड,उषाताई शिंदे, मानवी हक्क अभियानचे शहराध्यक्ष अशोक भोसले, अँड.विद्या शिंदे, भाजपा चिटणीस चंद्रकांत पाटोळे, रजनीताई ताठे,दत्तात्रय गोरखे,लखन साळवे आदी उपस्थित होते. सुनिल सकट यांनी त्यावेळी डॉ.बाबासाहेबांची पुस्तके वाटप केली.