मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

संघर्षनामा वृत्तसेवा lअहिल्यानगर

 दि. १८ डिसेंबर २०२५

प्रतिनिधी ,

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत असलेल्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमधील रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी प्रवेशासाठी संबंधित वसतिगृहाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंटीवार यांनी केले आहे.

​सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृहांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. याकरिता विद्यार्थ्यांनी आपल्या तालुक्यातील वसतिगृहाशी अथवा सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी नाका, अहिल्यानगर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ०२४१-२३२९३७८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Related Post