स्टेट बँक नगर एमआयडीसी येथे आजी माजी सैनिकांची बैठक संपन्न.

संघर्षनामा न्यूज l नगर

दि.२जून २०२४

प्रतिनीधी,

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा एमआयडीसी नागापूर अहमदनगर शाखेचे शाखाप्रमुख श्री प्रशांत महेंद्रकर यांनी पंचक्रोशीतील आजी -माजी सैनिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठक अचानक आयोजित केली असली तरी प्रमुख सैनिक उपस्थित होते .

   शाखेचे फिल्ड ऑफिसर  आकाश कुमार यांनी स्टेट बँकेत मधील नवीन योजनांची  इत्तमभूत माहिती उपस्थीत सैनिकांना सविस्तर समजावून सांगितली. 

होम लोन मधील नवीन व्याजदरा बद्दल तसेच डीएसपी व पीएमएसपी अकाउंटला मिळणारे लाभ जे आजपर्यंत सैनिकांना माहीतच नव्हते ते अगदी सुलभ भाषेत समजावून सांगितले. सैनिकांकडून कसल्याही प्रकारच्या लोन फाईल साठी प्रोसेसिंग फी आकारली जाणार नाही याबद्दल अस्वस्थ केले. 

कार लोन, पर्सनल लोन, होम लोन ,एज्युकेशन लोन अशा अनेक प्रकारच्या लोणबाबत नवीन फायदेमंद नियमावली बद्दल बँक मॅनेजर  महेंद्रकर साहेबांनी विषद केली. शाखेत येणारा प्रत्येक सैनिक आमच्यासाठी खूप आदराचा व महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले .

    यावेळी जयहिंद माजी सैनिक बहुद्देशीय सेवाभावी संस्था (म.रा.) राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ  उल्हारे यांनी पंचक्रोशीतील सर्व सैनिकांच्या वतीने बँके संबंधित मूलभूत समस्यां शाखा प्रमुखाकडे मांडल्या व त्यावर तात्काळ अंमल करण्यासंबंधी विनंती केली. 

या सर्व सुविधा आजी माजी सैनिक /अर्धसैनिक, वीरनारी ,वीरपिता, वीरमाता , वीरपत्नींना एकत्रितपणे मिळाव्यात त्यांच्या अनेक मूलभूत समस्या समाधानासाठी सर्व सैनिकांच्या वतीने रविवार दि. ९/६/ २०२४ रोजी सकाळी ठीक १० वा. नगर मनमाड रोड लगत श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, चेतना कॉलनी. नवनागापूर अहमदनगर येथे सर्वांच्या संगतमताने बैठक घेण्यावर एकमत झाले .

प्रसंगी सैनिक अर्धसैनिकांना  येणाऱ्या सर्व स्तरावरील  पेन्शन ,महसूल जमीन,पाणी, शैक्षणिक, घरपट्टी,करपट्टी बद्दल अशा अनेक समस्यांचे कायमस्वरूपी समाधान करण्यासाठी सैनिक कृती समिती स्थापन करून शासकीय ,राजकीय अधिकाऱ्यांपर्यंत पाठपुरावा करनेकामी कायदेशीरपणे लोकशाही मार्गाचा वापर करून दबाव तंत्र निर्माण करण्यासाठी चर्चा करण्याचे ठरले.

 यावेळी स्टेट बँकेतील झालेल्या बैठकीत लहू सुलाखे मेजर ,बाबासाहेब टेलोरे मेजर, संतोष गायकवाड मेजर ,भाऊसाहेब डाके मेजर ,विष्णू दौंड मेजर ,रामदास ठोकळ मेजर ,आत्तार मेजर, विशाल गायकवाड मेजर, शिवाजी कुराडे मेजर ,सागर भोंदे मेजर ,व रवींद्र इंगळे मेजर हे सर्व माजी सैनिक उपस्थित होते.

                       ----- चौकट ----

 रविवार दिं ९/ ६ /२०२४  रोजी सकाळी दहा वाजता विठ्ठल रुक्माई मंदिर चेतना कॉलनी नवनागापुर येथे विशेष बैठकीचे आयोजन केले असुन वेळी यावेळी आजी माजी सैनिक,अर्ध्यसैनिक, विरपत्नी, विरनारी, विरमाता, विरपिता परिवारांच्या विवीध अडचणी,मूलभूत प्रश्न,नागरी सुविधा गतिमान करण्यासाठी कृती समिती गठीत केली जाणार आहे.तरी पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक,अर्ध्यसैनिक परिवारांनी बहुसंख्येने उपस्थित रहावं असे आवाहन जयहिंद माजी सैनिक संस्थेचे राज्याध्यक्ष मेजर निलकंठ उल्हारे यांनी केले आहे.

Related Post