एकनाथ आळेकर व रमेश भोंडवे यांचा राजमाता जिजाऊ पतसंस्थेकडून सन्मान

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .१२ एप्रिल २०२६

श्रीगोंदा (प्रतिनिधी) : श्रीगोंदा येथील प्रगतशील शेतकरी, तसेच कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे आणि सहकार क्षेत्रात दांडगा अनुभव असलेले एकनाथरावजी आळेकर यांची सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना च्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.

तसेच वांगदरी येथील मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल रमेश भोंडवे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. दोन्ही मान्यवरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभात संस्थेचे चेअरमन प्रकाश निंभोरे, व्हा. चेअरमन बाळासाहेब भोर, संचालक माधव बनसुडे, तसेच मॅनेजर संजय सोनवणे आणि ॲड. महेश क्षीरसागर यांच्या हस्ते दोघांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी संस्थेचे संचालक, सभासद व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी एकनाथरावजी आळेकर व रमेश भोंडवे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला.

Related Post