संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि .११ एप्रिल २०२६
लिंपणगाव ( प्रतिनिधी )दिनांक 01/04/ 2026 रोजी श्रीगोंदा वकील संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली सदर निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी अँड .जयंत शिंदे, उपाध्यक्षपदी अँड .संपत इधाटे, महिला उपाध्यक्षपदी अँड .विजया जाधव /घोडके, सचिव पदी अँड .संदीप सातपुते, महिला सचिव/ ग्रंथपाल पदी अँड .सविता आसवले, तसेच खजिनदारपदी अँड .राजन नहार यांची निवड झाली.
त्यानंतर दिनांक 09/04/2026 रोजी श्रीगोंदा वकील संघाची सभा आयोजित करण्यात आलेली होती सदर सभेमध्ये श्रीगोंदा वकील संघाचे माजी अध्यक्ष अँड. प्रसाद इंगळे व त्यांचे पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा श्रीगोंदा वकील संघा तर्फे निवडून आल्याबद्दल सत्कार केला तसेच श्रीगोंदा वकील संघाच्या सन 2026- 27 या कार्यकाळाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड.जयंत शिंदे व नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्याकडे सोपवली. अँड .शिंदे यांनी वकील संघाचे अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
त्यावेळी श्रीगोंदा वकील संघाचे सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ तसेच महिला विधीज्ञ हजर होते सर्व वकील बांधवांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.