श्रीगोंदा मतदारसंघात विशेष पुनरीक्षणाला सुरुवात,मतदारांना पडताळणीचे आवाहन

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .१० एप्रिल 

श्रीगोंदा (प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत श्रीगोंदा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार सचिन डोंगरे यांनी नागरिकांना आपल्या नावांची व माहितीची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.

मतदार यादी अचूक व अद्ययावत राहावी यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत मतदारांचे नाव, पत्ता, जन्मतारीख तसेच कुटुंबीयांची माहिती योग्य असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. चुकीची माहिती असल्यास ती दुरुस्त करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागरिकांनी आपल्या मतदान केंद्राशी संपर्क साधून किंवा संबंधित बीएलओमार्फत आवश्यक तपशील तपासून घ्यावेत. तसेच टेबल पातळीवरील पडताळणी, वंशावळीचे नकाशीकरण आणि अद्याप नोंद न झालेल्या मतदारांची नोंदणी याही प्रक्रिया सुरू आहेत.

या विशेष पुनरीक्षण मोहिमेद्वारे मतदार यादीतील त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव यादीत समाविष्ट करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related Post