संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि .१५ फेब्रुवारी २०२६
मुकुंद निघोजकर यांचेकडून,
गिनीज बुकात नोंद असलेले निघोज येथील कुंडक्षेत्र दिवसेंदिवस विकास कामामुळे श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या ग्रामस्थांच्या तसेच भाविक भक्तांच्या सहकार्यामुळे मुंबईकर मंडळ निघोज येथील सहकार्यामुळे तसेच खासदार निलेश लंके, आमदार काशीनाथ दाते सर तसेच अनेक भाविक भक्तांच्या सहकार्यातून माता मळगंगेच्या कुंडक्षेत्र येथे विकास होत आहे. गिनीज बुकात नोंद असल्यामुळे अनेक सहली सातत्याने कुंड पाहण्यासाठी येत असतात आता यामध्ये ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कामे झालेली असल्यामुळे तसेच निसर्गरम्य असे वातावरण तयार झाले असल्यामुळे पर्यटकांसाठी विविध सोय केल्यामुळे पर्यटक आकर्षित झाले आहे तसेच माता मळगंगेचे भक्तही सातत्याने या ठिकाणी दर्शन घेऊन पुनीत होत असतात या ठिकाणी अनेक कुटुंबाकडून रितीरिवाजाप्रमाणे पाळणा सोडला जातो अनेक धार्मिक कार्यक्रम केले जातात सवाष्ण भोजन केले जाते. त्यामुळे माता मळगंगेचे कृपा सातत्याने त्यांना लाभत आहे आपणही या मातेचे दर्शन घेऊन तसेच कुंड पर्यटन क्षेत्राला भेट देऊन आपला आनंद उन्नत करावा असे आवाहन श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव शांताराम कळसकर ,कार्याध्यक्ष वसंतराव कवाद सर,उपकार्याध्यक्ष अमृतराव रसाळ यांनी पत्रकार द्वारे केली आहे. अशी माहिती ट्रस्टचे प्रसिद्धीप्रमुख मुकुंदराव निघोजकर यांनी दिली आहे.