संघर्षनामा वृत्तसेवा l पारनेर
दि.२७ जानेवारी २०२६
निघोज प्रतिनिधी,
पारनेर तालुक्यातील विकासकामे करताना मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळा, कब्रस्तान, मशीद परिसर या परिसरातील विकासकामांसाठी राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते सर यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे करीत मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणात विकासाभिमुख योगदान दिले असल्याचे प्रतिपादन राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच व भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज कारखिले यांनी व्यक्त केले आहे. निघोज येथील जामा मशीद परिसरात नामदार विखे पाटील यांच्या माध्यमातून २० लाख रुपये निधी उपलब्ध करून विश्रामीका देण्यात आली. या विकासकामाचा लोकार्पण सोहळा संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ व कारखिले यांच्या हस्ते उद्घाटन करुण करण्यात आला यावेळी ते बोलत होते. मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ कारभारी ईस्मालभाई पापाभाई हावलदार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मशीदीचे ईमाम अफजल साहब, पत्रकार सलीमभाई हावलदार, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष साजिदभाई तांबोळी, मुस्लिम समाजाचे युवा नेतृत्व शाहबाझ सय्यद, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार निघोज सोसायटीचे संचालक असिमभाई हावलदार , ठेकेदार अमीर शेख आदी तसेच मुस्लिम समाजातील युवक, ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच कारखिले यावेळी म्हणाले निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे करताना गेली आठ वर्षांमध्ये संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी नामदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. यामध्ये सर्वधर्मसमभाव या सामाजिक भावनेने काम करताना दरोडी,रांधे, अळकुटी,निघोज येथील मुस्लिम समाजासाठी जवळपास दोन कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागतील अशी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे काम केले आहे. पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीनिष्टा श्रेष्ठ आहे. आपला माणूस आपल्यासाठी असतो म्हणून या ठिकाणी आपले काम कोण करतो विकासकामे कोण आणतो याला महत्त्व देण्याची गरज आहे. नामदार विखे पाटील,माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते सर यांच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून आगामी निवडणुकीत मुस्लिम समाज बांधवांनी सचिन पाटील वराळ यांच्या पाठीशी उभे राहून पाठबळ देण्याचे आवाहन कारखिले यांनी केले आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यावेळी म्हणाले समाजातील एकोपा कायम राहावा, समाजाभिमुख विकासकामे मोठ्या प्रमाणात होण्यासाठी निघोज व परिसर एकसंध आहे. यामध्ये मुस्लिम समाजातील युवक व ज्येष्ठ मार्गदर्शक यांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच ही विश्रामीका अतिशय चांगल्या पद्धतीने बांधकाम करीत आकर्षक करण्याचे काम केल्याबद्दल त्यांनी ठेकेदार अमीर शेख यांचे कौतुक केले.
मुस्लिम समाजाचे युवा नेतृत्व शाहबाझ सय्यद यांनी यावेळी प्रास्ताविक भाषणात झालेल्या विकासकामांची माहिती देऊन सचिन पाटील वराळ व पंकज कारखिले यांचे कौतुक केले. तसेच सर्वाधिक विकासकामे समाजासाठी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करीत समाजाच्या वतीने आभार मानले.यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने कारखिले व वराळ पाटील यांचा सत्कार व्यापारी असोसिएशन पदाधिकारी रफिकभाई हावलदार, जाफरभाई मोमीन यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्लिम समाजाचे अध्यक्ष साजिदभाई तांबोळी यांनी केले शेवटी अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार यांनी आभार मानले.
चौकट -
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी गेली सात ते आठ वर्षांच्या कार्यकाळात मुस्लिम समाज बांधवांच्या सुखसोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. एक समाजाभिमुख नेतृत्व म्हणून सचिन भाऊ यांचा मुस्लिम समाजाला अभिमान आहे.
शाहबाझ सय्यद ( युवा नेतृत्व ) सुजय विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते सर यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे करीत मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणात विकासाभिमुख योगदान दिले असल्याचे प्रतिपादन राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच व भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज कारखिले यांनी व्यक्त केले आहे. निघोज येथील जामा मशीद परिसरात नामदार विखे पाटील यांच्या माध्यमातून २० लाख रुपये निधी उपलब्ध करून विश्रामीका देण्यात आली. या विकासकामाचा लोकार्पण सोहळा संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ व कारखिले यांच्या हस्ते उद्घाटन करुण करण्यात आला यावेळी ते बोलत होते. मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ कारभारी ईस्मालभाई पापाभाई हावलदार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मशीदीचे ईमाम अफजल साहब, पत्रकार सलीमभाई हावलदार, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष साजिदभाई तांबोळी, मुस्लिम समाजाचे युवा नेतृत्व शाहबाझ सय्यद, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार निघोज सोसायटीचे संचालक असिमभाई हावलदार , ठेकेदार अमीर शेख आदी तसेच मुस्लिम समाजातील युवक, ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच कारखिले यावेळी म्हणाले निघोज - अळकुटी जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणात विकासकामे करताना गेली आठ वर्षांमध्ये संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी नामदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. यामध्ये सर्वधर्मसमभाव या सामाजिक भावनेने काम करताना दरोडी,रांधे, अळकुटी,निघोज येथील मुस्लिम समाजासाठी जवळपास दोन कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागतील अशी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे काम केले आहे. पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीनिष्टा श्रेष्ठ आहे. आपला माणूस आपल्यासाठी असतो म्हणून या ठिकाणी आपले काम कोण करतो विकासकामे कोण आणतो याला महत्त्व देण्याची गरज आहे. नामदार विखे पाटील,माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते सर यांच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून आगामी निवडणुकीत मुस्लिम समाज बांधवांनी सचिन पाटील वराळ यांच्या पाठीशी उभे राहून पाठबळ देण्याचे आवाहन कारखिले यांनी केले आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यावेळी म्हणाले समाजातील एकोपा कायम राहावा, समाजाभिमुख विकासकामे मोठ्या प्रमाणात होण्यासाठी निघोज व परिसर एकसंध आहे. यामध्ये मुस्लिम समाजातील युवक व ज्येष्ठ मार्गदर्शक यांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच ही विश्रामीका अतिशय चांगल्या पद्धतीने बांधकाम करीत आकर्षक करण्याचे काम केल्याबद्दल त्यांनी ठेकेदार अमीर शेख यांचे कौतुक केले.
मुस्लिम समाजाचे युवा नेतृत्व शाहबाझ सय्यद यांनी यावेळी प्रास्ताविक भाषणात झालेल्या विकासकामांची माहिती देऊन सचिन पाटील वराळ व पंकज कारखिले यांचे कौतुक केले. तसेच सर्वाधिक विकासकामे समाजासाठी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करीत समाजाच्या वतीने आभार मानले.यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने कारखिले व वराळ पाटील यांचा सत्कार व्यापारी असोसिएशन पदाधिकारी रफिकभाई हावलदार, जाफरभाई मोमीन यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्लिम समाजाचे अध्यक्ष साजिदभाई तांबोळी यांनी केले शेवटी अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार यांनी आभार मानले.
चौकट -
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी गेली सात ते आठ वर्षांच्या कार्यकाळात मुस्लिम समाज बांधवांच्या सुखसोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. एक समाजाभिमुख नेतृत्व म्हणून सचिन भाऊ यांचा मुस्लिम समाजाला अभिमान आहे.
शाहबाझ सय्यद ( युवा नेतृत्व )