संघर्षनामा वृत्तसेवा l पारनेर
दि.१३ जानेवारी २०२६
प्रतिनिधी,
सध्या राज्यभर बहु चर्चित असलेल्या लातूर जिल्ह्यातील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी गुन्ह्याची एस आयटी चौकशी व्हावी, अशी मागणी लहुजी शक्ती सेना पारनेर तालुका यांच्या वतीने करण्यात आली.
नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकणारी मातंग समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातील दलित कन्या अनुष्का पाटोळे हिचे शाळेमध्ये असताना मृत्यू झाला.शाळा व्यवस्थापन च्या मते तिने आत्महत्या केली आहे.
परंतु अनुष्का हिने आत्महत्या केली नसून हा घातपात च असल्याचा दावा लहुजी शक्ती सेनेने केला आहे.
महाराष्ट्रात दलितांवरील अन्याय , अत्याचार प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहे.
यावर ठोस उपाययोजना म्हणून या प्रकरणातील जे आरोपी असतील त्यांची एस आय टी चौकशी करण्यात यावी व आरोपींना लवकरात लवकर फाशी ची शिक्षा द्यावी अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली.
पारनेर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक खेडकर साहेब व तालुका दंडाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
त्या वेळी अहिल्यानगर चे जिल्हाध्यक्ष किरण भाऊ उमाप,तालुका अध्यक्ष कृष्णा शेलार,सचिव विकास साळवे ,
वि.स.अध्यक्ष युवराज अवचार ,समन्वय तथा मार्गदर्शक मोहन राव साळवे,महिला आघाडीच्या अध्यक्षा राणी ताई उमाप ,युवक उपाध्यक्ष राहुल साळवे, सोशिअल मिडिया अध्यक्ष साईनाथ राक्षे इ.उपस्थित होते .