संघर्षनामा वृत्तसेवा । नगर
दि . ९ जानेवारी २०२६
प्रतिनधी,
लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या मातंग समाज्यातील अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी विद्यालयातील मुख्याध्यापक आणि मृत्यूस कारणीभूत असलेली शिक्षिका तसेच या गुन्ह्यात सहभागी असलेले विद्यालयातील कर्मचारी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ,या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले, त्यावेळी प्रदेशाध्यक्ष डॉ. काशिनाथ सुलाखे पाटील ,जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, जिल्हाकार्याध्यक्ष कडूबाबा लोंढे , महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अरुणाताई कांबळे, उत्तर जिल्हाध्यक्षा मंदाकिनी मेंगाळ, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सकट, कर्जत तालुकाध्यक्ष बबनराव उकिर्डे महाराज, मधुकर उकिर्डे, रफिक शेख ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते,