संघर्षनामा न्युज l श्रीगोंदा
दि.१७ ऑगस्ट २०२४
लिंपणगाव ( प्रतिनिधी) मौजे लिंपणगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य त्यांनी एकत्र येऊन 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनी ते देश सेवेतील गावातील सेवेमध्ये आपले सर्वोच्च पदान करणारे स्वतंत्र सैनिक माजी सैनिक व सीमेवर कर्तव्य बजावत असणारे सैनिक यांच्या ग्रामपंचायत मे आगळावेगळा उपक्रम 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधून शहीद जवानांना मानवंदना देऊन पुष्पहार समर्पित केले व माजी सैनिकांचे श्रीफळ शाल देऊन सन्मान करण्यात आला समारंभ लिंपणगावचे ज्येष्ठ माजी सैनिक श्री सावळेराम दाजी ठोमस्कर यांच्या हस्ते ग्रामपंचायत मधील ध्वजारोहण करण्यात आले.
लिंपणगाव मधील श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय येथील ध्वजारोहण श्री स्वप्निल बाळासाहेब घुले हे देशसेवे मध्ये कार्यरत असणारे सैनिक यांच्या हस्ते करण्यात आला.
लिंपणगाव मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील ध्वजारोहण जेष्ठ माजी सैनिक श्री भगवान परशुराम ढगे यांच्या हस्ते संपन्न झाला.
तसेच लिंपणगाव पंचक्रोशीतील सर्व उपस्थित 10 ते15 स्वातंत्र्यसैनिक व आजी माजी सैनिक यांचा ग्रामपंचायत मार्फत श्याल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत च्या उपक्रमामध्ये गावचे सरपंच; उपसरपंच; सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांचे माजी सैनिकांनी आभार व्यक्त केले.