छोटे ध्येय ठेवणे गुन्हा आहे - अँड वाल्मीक निकाळजे .

संघर्षनामा न्युज l श्रीगोंदे 

दि.२६जुलै २०२४

प्रतिनिधि,

श्रीगोंदा :- विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवावेत छोटे ध्येय ठेवणे गुन्हा आहे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वाल्मीक तात्या निकाळजे यांनी केली ते राहुल विद्यार्थी वस्तीग्रह श्रीगोंदा येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्षस्थानी वंचित युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश गायकवाड हे होते .ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक अडचणीवर मात करीत आपले शिक्षण पूर्ण केले . बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक संघर्ष केले. आणि सर्वांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दिला. अनेक संघर्षाच्या माध्यमातून भारतीय संविधानाची निर्मिती केली .संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकाराचा प्रत्येक विद्यार्थ्याने प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावेत . तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे ही ते म्हणाले  यावेळी सामाजिक कार्यकर्ते  नाना सांगळे ,फरीद इनामदार,  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक समन्वयक सतीश ओहोळ यांनी केले तर आभार सचिन घोडके यांनी मानले

Related Post