तांदळेश्वर सेवा सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न..

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२९ सप्टेंबर २०२४

आज दिनांक २९/ ९/२०२४ रोजी तांदळेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीचे चेअरमन संजय बापूराव शेळके यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.   

सभेचे प्रास्ताविक सचिव श्री शरदराव निकम यांनी केले. दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात करण्यात आली सभेमध्ये श्री संजय निगडे सरपंच तांदळी दुमाला, प्रा.अशोकनाना शेळके, श्री गौतमराव धालवडे, श्री देविदास भोस,श्री प्रतापराव भोस, श्री राजेंद्र भोस,श्री झुंबर खुरांगे यांनी मनोगत व्यक्त केले. सभासदांच्या प्रश्नांना व्हा.चेअरमन नानासाहेब हराळ,संचालक श्री निलेश शेळके यांनी समर्पक उत्तरे दिली.

  सोसायटीच्या आर्थिक मजबुतीसाठी सभासदांनी कर्ज वसुलीसाठी सहकार्य करावे त्यामधील नफ्यातूनच आपल्याला सोसायटीचे इतर विधायक कामे करता येतील अशी भावना चेअरमन संजयराव शेळके यांनी व्यक्त केली.

 सभेसाठी बापूसाहेब शेळके, हौसराव बोरुडे, नामदेव धालवडे,आबासाहेब भोस, अजय शेळके, नवनाथराव भोस, हरिचंद्र शेळके, अनिलराव शेळके बुणगे सर व मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थित होते.

Related Post