संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.९ऑक्टोंबर २०२४
प्रतिनिधी,
आंबट किंवा गोड लोणचे बनविण्यासाठी जे पदार्थ वापरले जातात ते एक दुसऱ्याला त्यांच्या गुनासह समावून घेतात.
कैरी आंबट आहे, साखर आणि गुळ गोड आहे, मेथी कडू आहे, मिरची तिखट आहे व मीठ खारट आहे.
ते एका बरणीमध्ये एकत्र राहतात.
म्हणून लोनचे मधुर बनते.
हेच याचे रहस्य आहे.
त्याचप्रमाणे पक्ष व संघटनेमध्ये कार्य करणारे माणसं
अलग- अलग स्वभावाचे असले तरी
त्यांना लोणच्या प्रमाणे सामावून घ्यावे.
लोणच्यासाठी वापरले गेलेले सर्व पदार्थ एकत्र मिळून
जसे एकाच बरणीत राहतात.
एक दुसऱ्याचे गुण घेतात. त्याचप्रमाणे एका कुटुंबामध्ये, संघटनेमध्ये व पक्षामध्ये एका झेंड्याखाली रहा.
एक दुसऱ्याचे गुण घ्या...!!
मग तुमच्या संघटनेला व पक्षाला मधुरता येईल.
कितीही कठीण परिस्थिती आली तरी
समन्वयाने एकत्र आणि संघटित रहा...!!
एक दुसऱ्याचे गुण घ्या...!!
त्यांच्या बरोबर रहा...!!
त्यांची साथ निभवा...!!
तुम्ही जरूर यशस्वी व्हाल.
लोणच्यामध्ये वापरलेल्या पदार्थांनी आपला मूळ स्वभाव सोडला नाही,
एकत्र आले नाही,
तर मधुर लोणचे बनू शकत नाही .
यामधील एक पदार्थ अलग झाला तरी, लोणच्याची चव बदलते.
म्हणून आपण देखील कुणाची साथ सोडायची नाही.
जर साथ सोडली तर संघटित राहू शकत नाही.
माणसाने आपली वृत्ती चांगली ठेवावी.
आपल्या महत्वकांक्षाचा त्याग करून, समाज, संघटना व पक्षाच्या समृद्धीचे लक्ष ठेवून निरंतर कार्य केले पाहिजे.
आपले उत्कृष्ट योगदान दिले पाहिजे.
आपण असे केले तर, यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.
जगन्नाथ खामकर
कोर कमिटी अध्यक्ष
भारतीय जवान किसान पार्टी महाराष्ट्र