मेजर धनेश्वर भोस यांच्याकडून धावडे वस्ती अंगणवाडीस ११,०००/-ची मदत..

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२८ सप्टेंबर २०२४

प्रतिनिधी,

तांदळी दुमाला तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ग्रामपंचायतच्या हद्दीतील धावडे वस्ती वरील अंगणवाडी लोकसहभागातून बांधकाम करण्याचे अवाहन ग्रामस्थांना करण्यात आले आहे.

हे अंगणवाडी केंद्र तुटपुंज्या अवस्थेत उपलब्ध असल्या मुळे येथे बालकांची खूपच गैरसोय होते फक्त १०-१२फुटाच्या कच्चा खोली मध्ये अध्ययन, आहार व्यवस्थापन आदि बाबीअडचनी साठीसाठी सध्या स्थितीमध्ये हा निवारा  ग्रामपंचायतच्या व ग्रामस्थांच्या सहकार्यातून कच्च्या स्वरूपात बांधकाम झालेला असून त्यामध्ये मुलांना बसवण्यास अडचण निर्माण होत आहे ही वास्तव परिस्थिती कारगिल योद्धा मेजर धनेश्वर भोस यांना सांगितली असता त्यांनी या विधायक कार्यास तात्काळ रू.११०००/- ची मदत केली.

 ग्रामपंचायत ने मुलांना खेळण्या साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे परंतु ते ठेवण्यासाठी अडचण निर्माण होते आणि ह्या सर्व गोष्टी पाल्यांच्या लक्षात अंगणवाडी सेविका यांनी आणून दिल्या आणि सरपंच उपसरपंच ग्रामस्थ आणि पाल्यांनी शिक्षण हे केंद्रबिंदू मानून अंगणवाडी ही मुलांचा शिक्षणीक पाया असून मुलांचा प्रथम शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुलांना बसण्यासाठी आणि शिकण्यासाठी चांगल्या पद्धतीने एका खोलीचे बांधकाम करायाचे आहे परंतु ते लोकसहभागातून शक्य आहे याकरता दानशूर देणगी दात्यांना देणगीचे अवाहन करण्यात आले होते या अवाहानाची दखल घेऊन   तांदळी गावचे भूषण व तांदळीचे सुपुत्र मा.मेजर धनेश्वर पतंगराव भोस यांनी अकरा हजार रुपयाची देणगी सुपूर्त केलीआहे .

 त्यांनी देशसेवा पूर्ण करून झाल्यानंतर शिक्षण केंद्रबिंदू मानून आढळगाव पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय त्याच बरोबर तांदळेश्वर माध्यमिक विद्यालयास मोठ्या प्रमाणात देणगी देऊन शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे काम केले. अशा ह्या दानशूर भारत मातेच्या रक्षणासाठी कारगिल युद्धामध्ये लढत असताना आपला एक पाय गमावला त्या शूरवीर आणि दानशूर आणि त्यांच्या नावात धनेश्वर मनाने ही मेजर धनेश्वर पतंगराव भोस  यांनी अकरा हजाराची देणगी अंगणवाडी केंद्रास मदत केल्याबद्दल त्यांचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद करण्यातआले.

 शाळा ही एक गुरुकुल मंदिर असून या मंदिरामध्ये गावाचेच नव्हे तर भारताचे भवितव्य ठरवणारी पिढी निर्माण होणार आहे म्हणून ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापनासाठी आणि मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध  करून देण्याकरता जास्तीत जास्त सहकार्य करण्याची गरज असून हे अंगणवाडी केंद्र उभे करण्यासाठी ग्रामस्थांनी भरभरून देणगी द्यावी अशी विनंती सामजिक कार्यकर्ते 

 संतोष शिंदे यांनी केली आहे.

Related Post