स्व.रंगनाथ घनवट यांच्या पुण्य स्मरणार्थ शरण वृद्धाश्रमास मिष्ठांन्न भोजन.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.२६ सप्टेंबर २०२४

प्रतिनिधी,

कै.जगन्नाथ रंगनाथ घनवट यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ शरणपूर वृद्धाश्रमास एक पोते बाजरी व मिष्टान्न भोजन देवून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. 

यावेळी ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथील डाॅ.प्रा. उपप्राचार्य  अरूण घनवट सर यांनी आपल्या वडिलाच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ शरणपूर वृद्धाश्रमास एक पोते बाजरी व मिष्टान्न भोजन दिले. या छोटयाखाणी प्रसंगी ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्रा.प्रकाश कोकणे सर तसेच देवगड येथील भक्त गण प्रकाश दहातोंडे यावेळी उपस्थित होते सर्व मान्यवरांचे स्वागत व्यक्स्थापक संतोष मगर यांनी सर्वाचे स्वागत केले तसेच संस्थांपक अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी शरणपूर वृद्धाश्रमाची माहिती दिली तर प्रसिध्दी प्रमुख तसेच शरणपूर वृद्धाश्रमाचे सर्वोसर्वे आदरनिय पत्रकार सुधीर भाऊ चव्हाण यांनी वृध्दाश्रमातील चालू घडामोडींवर सर्वाना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Related Post