संघर्षनामा वृत्तसेवा - कर्जत
दिनांक 10 ऑक्टोबर 2024
महात्मा फुले नूतन महाविद्यालयामध्ये आंतर विभागीय क्रॉस कंट्री क्रीडा स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मा. श्री रमेश गायकवाड (सिनेट सदस्य), श्री हर्षद चौकडे, श्री आदित्य चेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या बक्षिस वितरण व समारोप प्रसंगी मा. श्री. राहुल पवार, डॉ. महेंद्र चेडे, श्री.वैभव पवार हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. महेंद्र चेडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना खेळाकडे करियर म्हणूण पाहवे व त्यादृष्टीने परिश्रम घ्यावेत असे आवाहन केले तर श्री.हर्षद चौकडे यांनी खेळाडूना शुभेच्छ्या देताना यांनी शाळा,महाविद्यालये व विद्यापीठामध्ये शारीरिक शिक्षणाला महत्वाचे स्थान असून खेळामध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांमध्ये निषक्रीयता वाढत असून सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रयत्न करावेत असे सांगितले. या स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून विद्यापीठ क्रीडा मंडळ, कक्षाधिकारी, डॉ.शिवाजी उत्तेकर हे उपस्थित होते तर निवड समिती सदस्य म्हणून डॉ. विजय कुमार भेगले, प्रा. रतन गांगुर्डे, प्रा.मंगेश साळवे, त्याचबरोबर अहमदनगर, नाशिक, पुणे जिल्हा व पुणे शहर या चारही विभागातील मुले व मुलींचे संघ व संघव्यवस्थापक उपस्थित होते. यावेळी आखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रॉस कंट्री क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेल्या विजेत्या खेळाडूना मान्यवरांच्या यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धामध्ये अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, पुणे शहर,व पुणे जिल्हा विभागाचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये एकूण २४ खेळाडू विद्यार्थि व खेळाडू विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेमधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला. मुलांमध्ये विश्वजीत कचरे- पुणे शहर, दयाराम गायकवाड -नाशिक विभाग, वामन बागुल- नाशिक विभाग, गणेश आठवले -पुणे जिल्हा, प्रसाद गव्हाणे- अहमदनगर विभाग, कार्तिक कुमार करिअर हरपल- नाशिक विभाग- या खेलाडूची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघामध्ये निवड झाली. त्याचबरोबर मुलींमध्ये रवीना गायकवाड - नाशिक विभाग, साक्षी बोरुडे - पुणे शहर विभाग, निशा पासवान - पुणे शहर, सुरेखा मताने -अहमदनगर विभाग, शितल तांबे - पुणे जिल्हा विभाग व विशाखा शिंदे - पुणे शहर विभाग, या मुलींची बेंगलोर या ठिकाणी होणाऱ्या अखिल भारतीय अंतर्वित्त आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री पोलीस स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघामध्ये निवड झाली. त्याचबरोबर यावर्षी मुले विजेता संघ म्हणून नाशिक विभागाने प्रथम क्रमांक प्राप्त केला व मुलींचा विजेता संघ म्हणून पुणे शहर विभागांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेसाठी मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, डॉ दराडे व मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सोमनाथ दिवठे व वैभव सुपेकर, यांचेही सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे माजी खेळाडू विद्यार्थी हर्षद चौकडे, वैभव पवार, निलेश चिखले, प्राची खराडे महविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या स्पर्धा यशस्वी होण्यासाठीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विष्णू पेठकर, डॉ.शिवाजी उत्तेकर, रुरल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ए.बी. चेडे, डॉ. महेंद्र चेडे, मा. प्रकाश चेडे व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत मंडलिक यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.