सिनेअभिनेत्री शुभांजली थोरात लोहार समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.५ ऑक्टोंबर २०२४                            ‌‌                                                           ‌.                                    अजनुज प्रतिनिधी -सिने अभिनेत्री व प्रसिद्ध नृत्यांगना कुमारी शुभांजली थोरात हिला नुकत्याच  टाकळी (टे) तालुका माढा येथील गणेश तारा मंगल कार्यालय येथे लोहार समाजाच्या झालेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते लोहाररत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.                                         ‍.     इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या शुभांजलीने शिक्षणाबरोबरच तिची नृत्याची कला ही जोपासली आहे. सध्या सबसे जोरात - शुभांजली थोरात या स्वतःच्या नृत्याविष्काराच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य  करत असलेल्या शुभांजलीने अनेक मराठी चित्रपटांमधूनही आपली भूमिका साकारली आहे                  ‌                                शुभांजली थोरातला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय नृत्य रत्न पुरस्कारा बरोबरच, कलाश्री,कलारत्न, कलाभूषण,लावणी सम्राज्ञी, अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशा या गुणी बालनृत्यगणेच्या पाठीवर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची शाब्बासकीची थाप पडली आहे.          ‌.                                     यावेळी बोलताना शुभांजलीने सांगितले की, मला आत्तापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे परंतु आजचा लोहार रत्न हा पुरस्कार माझ्यासाठी खास असून तो मला माझ्या घरच्या लोकांनी व घरच्या लोकांसमोर दिला आहे, मी या निमित्ताने  माझ्या सर्व समाज बांधवांना आश्वासन देते की, मी माझे व माझ्या समाजाचे नाव सातासमुद्रापार  पोहचवेल.                   ‌.                                      या पुरस्कार वितरणासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, इंदापूरचे आमदार व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,  विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,  प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के, दादासाहेब कळसाईत, नितीन कळसाईत, संतोष थोरात, दिलिप वसव, दिलिप थोरात, मधुकर लोखंडे, नवनाथ हराळे, सागर लोहार यांच्यासह मोठ्या प्रमाणावर लोहार समाज बांधव उपस्थित होते.

Related Post