संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२९ सप्टेंबर २०२४
अजनुज प्रतिनिधी -श्रीगोंदा तालुक्यातील कौठा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालयाचे सचिव राजेंद्र परकाळे यांनी आपला वाढदिवस थाटामाटात न साजरा करता आपल्याच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कु. ज्ञानसी गवांडे हिची जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. गार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी त्रिंबक परकाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ही सत्कार करण्यात आला.आता पर्यंत ज्ञानसी हिला तीन गोल्ड मिडल,तीन सिल्व्हर मिडल,चार वेळा राज्यस्तरीय स्पर्धा खेळली आहे.सोलापूर, पिंपरी चिंचवड, पुणे, बालेवाडी , हिंगोली,वसमत,खराडी,कराड चषक नऊ वेळा स्पर्धा खेळली आहे.कु. ज्ञानसी हिला खेळासाठी आधुनिक साहित्याची गरज असून जर ते साहित्य कु.ज्ञानसी हिला सराव करण्यासाठी मिळाले तर नक्कीच त्या संधीच सोन केल्या शिवाय राहणार नाही पण त्यासाठी थोर दानशूर व्यक्ती पुढे आल्या पाहिजेत.
यावेळी माजी उपसरपंच उत्तम शिपलकर सर , सरपंच बापू मोरे,हौसराव परकाळे, धर्मवीरगड अभ्यासक लक्ष्मणराव नायकवडी, नितीन थोरात,राभाऊ काळभोर, राजेंद्र भालेराव,राजू शिपलकर, हनुमंत परकाळे, ज्ञानदेव थोरात,किसन खैरे,गजानन गवांडे, परशुराम सुपेकर, श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणपत परकाळे आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी परकाळे यांनी मानले.