वाऱ्याच्या प्रवाहामुळे गॅलन वांग्याचा एक एकर बाग भुईसपाट .

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१६ऑक्टोंबर २०२४

लिंपणगाव (प्रतिनिधी )श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील संतोष भिमाजी आल्हाट यांचा गॅलन जात असलेल्या वांग्याचा एक एकर भाग पाऊस व वाऱ्याच्या प्रवाहामुळे भुईसपाट झाला आहे. त्यामुळे या कष्टकरी शेतकऱ्याचे जवळपास तीन ते साडेतीन लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 14 ऑक्टोबर रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार लोणी व्यंकनाथ येथील शेतकरी यांनी आधुनिक पद्धतीने वांग्याची लागवड केली. त्या वांग्याला सुरक्षित व अबाधित जोपासण्यासाठी सहुबाजूने छत उभारले. परंतु अचानक सोमवारी सायंकाळी पाऊस व वाऱ्याच्या प्रवाहामुळे गॅलन वांग्याचा बाग काही क्षणातच भुईसपाट झाला. त्यामुळे या कष्टकरी शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागले आहे. सध्या शेतकरी कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याच्या तयारीत असताना निसर्ग मात्र शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावून घेत आहे. मागील दीड महिन्यापूर्वी संतोष आल्हाट यांनी जवळपास दीड एकर दोडक्याची आधुनिक पद्धतीने लागवड केली. दोडक्याचे उत्पन्न सुरू देखील झाले. परंतु अचानक पाऊस व वाऱ्याच्या प्रवाहामुळे सदर शेतकऱ्याचे जवळपास सहा लाखाचे नुकसान झाले. या संदर्भात श्री आल्हाट यांनी श्रीगोंद्याचे तहसीलदार; तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष दर्शनी उपस्थित राहून सदर माझ्या नुकसानीचे पंचनामे करावेत. परंतु तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून जर त्यावेळी पंचनामा झाला असता तर निश्चितपणे श्री आल्हाट यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली असती. परंतु प्रशासनाने मात्र फक्त बघ्याचीच भूमिका घेतल्याचा आरोप श्री संतोष आल्हाट या शेतकऱ्याने केला आहे. आता पुन्हा गॅलन जातीच्या वांग्याची तोड सुरू असताना निसर्गाने पुन्हा या पिकांवर घाला घातला. आता तरी मायबाप प्रशासनाने माझ्या या नुकसानीचा पंचनामा करून आम्हाला न्याय द्यावा; अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकरी संतोष आल्हाट यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. 

श्री संतोष आल्हाट हे अल्पभूधारक शेतकरी असून स्वतःच्या भांडवलतून वांगे दोडके इत्यादींची लागवड करून कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळेल या अपेक्षेवर बाग फुलवण्याचा प्रयत्न केला. परंतु निसर्ग मात्र वेळोवेळी असमानी संकट निर्माण करत असल्याने; आहे ते भांडवल देखील संपुष्टात आले आहे. दोन महिन्यांमध्ये जवळपास या अस्मानी संकटामुळे माझे नऊ लाखाचे नुकसान झाले. तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना देऊन तात्काळ गॅलन वांग्याच्या बागेचा पंचनामा करून योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा देखील श्री संतोष आल्हाट यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

Related Post