तांदळी दुमाला मध्ये भाद्रपद बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.५ऑक्टोंबर २०२४

प्रतिनिधी,

सालाबाद प्रमाणे याही वर्षी तांदळी दुमाला तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर गावामध्ये भाद्रपदी बैलपोळा ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. भारत हा एक कृषिप्रधान देश असून कृषी संस्कृती आपल्या भारत देशाचा श्वास व प्राण आहे. कृषी संस्कृती म्हटलं की शेती, शेतामध्ये राबणारा बळीराजा व त्याला साथ देणारा बैल वर्षभर शेतात शेतकऱ्यांच्या बरोबरीने राबणाऱ्या बैलांप्रती एक दिवस कृतज्ञ होण्याची संधी म्हणून ह्या सणाकडे पाहिले जाते. पोळा या सणानिमित्त आपल्या मनामध्ये मुक्या प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम, आपुलकी वाढत जावी.या बैलपोळ्या निमित्त शेतात घाम गाळणाऱ्या बळीराजाचे व बैलाचे कौतुक करण्यासाठी गावचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे, तांदळेश्वर विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन संजय शेळके, तांदळेश्वर विविध सहकारी सोसायटीचे मा.चेअरमन हौसराव बोरुडे , तांदळेश्वर विविध सहकारी सोसायटीचे मा.व्हा. चेअरमन राजू भोस, मा.चेअरमन आबासाहेब भोस, उपसरपंच कृष्णा धावडे, मा.उपसरपंच राजू भोस, पोलीस पाटील अनिल शेळके, आधुनिक लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, सदस्य झुंबर खुरांगे, जयसिंग भोस, ग्रा.म.प. सदस्य भरत शेळके, आदी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामस्थांनी आपले पशुधन म्हणजेच, बैल 5 वा मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालताना अत्यंत देखण्या, रुबाबदार आणि सजवलेल्या बैलांच्या जोड्या ग्रामस्थांना पाहण्यास मिळाल्या.मारुतीचे दर्शन घेऊन वाजवत गाजवत घरी नेऊन त्यांची पूजा करण्यात आली.

त्यादिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना भरवल्या नंतरघरातील सर्व व्यक्ती एकत्रित येऊन पुरणपोळीचे जेवण केले जाते .या देशांमध्ये अनेक जाती धर्माचे लोक वेगवेगळे सण, उत्सव  परंपरा, मोठ्या उत्साहाने साजऱ्या केल्या जातात. त्यामध्ये भाद्रपदी पोळा हा एक सण आहे.अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची मशागत करत असल्यामुळे बैलांच्या माध्यमातून होत असलेला शेती व्यवसाय बंद होताना दिसत असून क्वचित ठिकाणी बैलाच्या माध्यमातून शेती व्यवसाय करताना पाहायला मिळत आहे. तरी या पोळ्याच्या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांनी आपले पशुधन जोपासले पाहिजे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.

Related Post