राज्य स्तरीय सिलंबम स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड च्या खेळाडूंची यशस्वी कामगीरी....

संघर्षनामा वृत्तसेवा -  पुणे

दिनांक - 10ऑक्टोंबर 2024

 भद्रावती, चंद्रपूर येथे आयोजीत केलेल्या राज्य स्तरीय सिलंबम स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड च्या खेळाडूंनी सहभाग घेऊन. 7 सुवर्णपदक, 2 रौप्य पदक आणि 1 कांसी पदक जिंकले.

या स्पर्धेमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, चंद्रपूर, अकोला, नागपुर, सातारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम हे जिल्हे सहाभगी झाले होते.

खेळाडूंनी प्रामुख्याने काठी फिरवणे, तलवारबाजी, सुरुल (तमिळ दांडपट्टा) फिरवणे, मडवू (हरणाची शिंग) फिरवणे, कुथू वर्साई (रिकाम्या हाताने स्वसंरक्षण) या खेळ प्रकारात भाग घेऊन पदकांची कमाई केली.

विजयी खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे.

वेदान्त म्हेत्रे, ऋतुजा कुलकर्णी, भार्गव देडे, शिवदत्त सिंघ, शिवम बाबर.

विजयी खेळाडूंना सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष संजय बनसोडे, उपाध्यक्ष अभय नवले, आंतरराष्ट्रीय सिलंबम पंच स्मिता धिवार, सचिव किरण अडागळे, रविराज चखाले, केतन नवले, सुदर्शन सूर्यवंशी, अजय नवले, निलम कांबळे, गणेश गेजगे यांचे मार्गदर्शन लाभले.


Related Post