भव्य कोजागिरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा .

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१७ऑक्टोंबर २०२४

प्रतिनिधी,

शिवशक्ती मित्र मंडळ गुणोरे नेहमीच भव्य दिव्य कार्यक्रम करण्यात प्रसिद्ध आहे . या वर्षी गणेश उत्सव व नवरात्र उत्सव अगदी उत्साहात साजरा करण्यात आला . या प्रमाणेच भव्य कोजागिरी पौर्णिमा उत्सव देखील उत्साहात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमासाठी गुणोरे गावातील ग्रामस्थ व मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता . या कार्यक्रमात महिलासांठी व लहान मुले मुलींसाठी दांडिया खेळाचे नियोजन करण्यात आले . सर्व उपस्थित महिलांना शिवशक्ती मित्र मंडळाचे सल्लागार श्री .संदिप साळवे यांसकडून आकर्षक भेटवस्तु देण्यात आली . उपस्थित सर्व लहान मुलांना व  मुलींना शिवशक्ती मित्र मंडळाचे सचिव श्री किरण बढे यांसकडून शालेय उपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या . या कार्यक्रमासाठी मंडळातील सर्वच कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला . या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व लहान थोर यांना शिवशक्ती मंडळामार्फत केशरयुक्त दुध वाटप करण्यात आले .या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री . विकास साळवे , उपाध्यक्ष अजित राऊत सचिव किरण बढे , सदस्य परवेज शेख , एकनाथ ओव्हाळ सर , अविनाश राऊत , देवीदास राऊत , सुनिल साळवे , बापू थोरात , रतन दाभाडे , गोरक ऊमाप , अमोल ढवळे , जयराम इंगळे , भरत राऊत , शेखर गायकवाड , किरण राऊत , सय्यद भंडारी , दत्ता दरेकर , यशवंत पंडित , हिम्मत बढे , श्रावण गोपाळे , सचिन ढवळे , पियुष साळवे , ओमकार सकट , अथर्व ढवळे , कृष्णा इंगळे हे कार्यकर्ते उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री रोहित कापरे सर व एकनाथ ओव्हाळ सर यांनी केले .तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अमोल लोंढे सर यांनी केले .

Related Post