संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२७सप्टेंबर २०२४
अजनुज प्रतिनीधी - राज्यातील शिक्षकांना वाढीव टप्पा मिळावा यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर भर पावसात शिक्षक समन्वय संघाचे हुंकार आंदोलन आज भर पावसात सुरू असून राज्य सरकार या बाबतीत सकारात्मक निर्णय घेवून पुन्हा एकदा ऐतिहासिक निर्णय आझाद मैदानावर होईल याचा आपण साक्षीदार होवू या आशेने काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालय बंद करून मिळेल त्या वाहनाने मुंबई येथील आझाद मैदान गाठले आहे.
या पवित्र अशा ज्ञानदान क्षेत्रात येवून आता फक्त उरले आहेत ती तीन चार वर्ष जाता जाता काही वाढीव टप्पा मिळाला तर त्याचा हातभार कुटुंबला लागले अशी अपेक्षा शिक्षकांची आहे.
आमच्या प्रतिनीशी बोलताना ओबीसी शिक्षक नेते प्रा.दिनेश झगडे यांनी सांगितले की महागाई काळात मिळणारा पगार हा अगदी अल्प असून लहान लेकरं बाळं, वृध्द आई वडील यांचा औषध पाण्याचा खर्च सुद्धा भागत नसल्याने पुढिल वाढीव टप्पा द्यावा असे प्रा.झगडे यांनी सांगितले.यावेळी राज्यातील असंख्य शिक्षक बांधव व शिक्षक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.