संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि ५ऑक्टोंबर २०२४
प्रतिनिधी, उज्वला उल्हारे
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री , क्षेत्र त्रंबकेश्वर,जिल्हा नाशिक सद्गुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व नाडी परीक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिर घोगरगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र( दिंडोरी प्रणित) येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. तज्ञ डॉक्टर पाटील, डॉक्टर गौरकर यांच्या मार्गदर्शनाने हृदयविकार, मधुमेह ,सर्व प्रकारचे कॅन्सर, रक्तदाब, सांध्याचे विकार, त्वचा विकार, वात विकार, पोटांचे विकार, महिलांचे विकार, मुतखडा, मुळव्याध, कावीळ ,लहान मुलांची विकार, मनोविकार इत्यादी विकारांची रोगनिदान आणि तपासणी केली गेली. अत्यंत माफक दारात आयुर्वेदिक औषधे दिली गेली.
आयुर्वेद घरोघरी जावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉक्टर गौरकर यांनी संघर्षनामाशी बोलताना विशेष प्रतिक्रिया व्यक्त केली . सविस्तर माहिती देताना ते म्हणाले ,शिबिराच्या माध्यमातून जे व्याधीग्रस्त आहेत, कॅन्सर ग्रस्त आहेत, ज्यांना जे काही आजार आहेत ते आजार त्यांचे दूर व्हावे आणि आजारी कोणीही पडू नये या उद्देशाने या शिबिरामध्ये मार्गदर्शन केले गेले. प्रत्येक शिबिरामध्ये हे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच जंक फूड कडे जी नवीन पिढी , वळलेली आहे त्याने अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होऊ लागलेले आहेत. त्यामुळे अनावश्यक पैसा खर्च होऊ लागला याचा परिणाम सर्वात जास्त लहान मुलांवर होऊ लागला. त्यांना सतत चिडचिडपणा ,अभ्यासात लक्ष न लागणे ,जे आजार मोठ्या माणसांना होत असतात तेच आजार कमी वयात लहान मुलांना होऊ लागले आहेत. या अनुषंगाने आयुर्वेद हा घरोघरी पोहोचला पाहिजे आणि कमीत कमी पैसा आरोग्यावर खर्च झाला पाहिजे. यासाठी अशा शिबिरांची मोहीम पूर्ण देशभर गतिमान आहे. या शिबिराच्या माध्यमातून त्यांना आध्यात्मिक तिकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो. प्रसंगी अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद घोगरगाव श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रा मधून मिळालेला आहे .
त्याप्रसंगी माजी सरपंच बाळासाहेब उगले, कृषी पर्यवेक्षक मिलिंद भोसले, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तरटे, माधव तरटे, संपत तरटे, बाळासाहेब बेरड समस्त सेवेकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.