संघर्षनामा वृत्तसेवा l नगर
दि.९ऑक्टोंबर २०२४
अहमदनगर (प्रतिनिधी)
भारतीय सैन्य दलात 20 वर्ष देश रक्षणाच्या सेवेनंतर तपोवन रोड, निर्मलनगर येथील मेजर सचिन बाबासाहेब दहिफळे नुकतेच निवृत्त झाले. सेवापुर्तीनिमित्त त्यांचा सन्मान करुन सत्कार करण्यात आला. यावेळी बाबासाहेब दहिफळे (वडिल), जिजाबाई दहिफळे (आई), बंडू नागरगोजे, किरण आव्हाड, बबन कुसळकर, स्वामी म्हस्के, कारभारी सांगळे, गणेश दराडे, बंडू मोरे, महेश आव्हाड, सचिन दासपुते, रावसाहेब राउतराय, शैलेश देशमुख,शिवाजी भाबड, इंदुबाई नागरगोजे, भाग्यश्री सांगळे, प्रियंका दराडे, प्रणील नागरगोजे, प्रांजल नागरगोजे, सुभाष दहिफळे आदींसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेजर सचिन दहिफळे यांनी सैन्य दलात असताना मणिपूर, जालांदर कॅन्ट, पंजाब, 44 आर.आर. जम्मू, जोधपुर, राजस्थान, आसाम, पठाणकोट, पंजाब, बारामुल्ला, जम्मू व पुणे या ठिकाणी सेवा देऊन देश रक्षणाचे कर्तव्य बजावले. त्यांचे मुळगाव पाथर्डी तालुक्यातील विठ्ठलवाडी असून, त्यांचे मोठे बंधू अशोक दहिफळे हे देखील सैन्य दलात होते. दहिफळे दांम्पत्यांनी शेती व ऊस तोडणीचे काम करुन हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण देऊन दोन्ही मुलांना सैन्यात पाठवले होते. देशभक्तीने भारावलेल्य दोन्ही मुलांनी देशसेवा करुन निवृत्त झाले आहेत. बहीण इंदुबाई नागरगोजे या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. उपस्थितांनी मेजर सचिन दहिफळे यांनी केलेल्या देशसेवेच्या कार्याचे कौतुक करुन आयुष्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.