श्रीगोंदा तालुका प्रमुख पदी किरण कुरुमकर यांची निवड

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे 

दि.२१जुलै २०२४

प्रतिनिधि,

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्या मार्गदर्शनाने युवा सेना सचिव वरुन सरदेसाई यांनी नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या त्यात श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगावचे युवा कार्यकर्ते किरण कुरुमकर यांची युवा सेना श्रीगोंदा तालुका प्रमुख पदी नियुक्ती केली आहे .

युवा नेते किरण कुरुमकर हे सर्वसामान्य कुटुंबातील असून ते कॉलेज जिवनापासुनच सामाजिक कार्यात भाग घेत आले आहेत किरण कुरुमकर हे गोरगरीब जनतेसाठी लढणारे नेतृत्व असल्याने शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी त्यांना शिवसेना पक्षात काम करण्याची संधी दिली 

किरण कुरुमकर यांच्या युवा सेना तालुका प्रमुख पदी झालेल्या निवडीबद्दल शिवसेना उपनेते साजन पाचपुते शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हाउपप्रमुख बाळासाहेब दुतारे, शिवसेना तालुका प्रमुख विजय शेंडे, युवा सेना जिल्हा प्रमुख प्रशांत भाले, वाहतूक सेना तालुका प्रमुख आण्णासाहेब जगताप, सचिन मुंढेकर कृष्णा ,भालेराव बापु माने यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Post