संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदे
दि.१८जुलै २०२४
लिंपणगाव (प्रतिनिधी) गुरुवार दि १८ जुलै २०२४रोजी सन्माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश श्री मुजीब शेख साहेब यांच्या प्रेरणेने श्रीगोंदा फॅक्टरी व जोशी वस्ती या परिसरातील स्थलांतरित होऊन आलेले शाळा बाह्य विद्यार्थी इयत्ता २री, ४थी व ६वी या वर्गात प्रवेशित करण्यात आले. याप्रसंगी न्यायाधीश श्री शेख यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश व पुष्पगुच्छ देऊन मुलांचे स्वागत करून या शाळाबाह्य मुलांना शालेय प्रवाहात दाखल केले. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा शुगर, जोशी वस्ती व इंदिरा गांधी विद्यानिकेतन,श्रीगोंदा फॅक्टरी या शाळांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. यानंतर मा. न्या. श्री शेख यांनी विद्यार्थ्यांना बालकांच्या कायद्याविषयीची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी श्रीगोंदा बार असोसिएशनचे अध्यक्ष. ॲड.वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. जठार, सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विठ्ठलराव जंगले, माजी संचालक ॲड.अशोक रोडे, श्रीगोंदा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. सत्यजित मच्छिंद्र, ॲड. घालमे मॅडम, सामाजिक कार्यकर्ते मधुकर काळाणे, केंद्रप्रमुख श्रीम. भालेकर मॅडम, पर्यवेक्षक श्री अनिल जाधव, जोशी वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश हराळ, श्रीगोंदा शुगर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पद्मा शिर्के मॅडम,IBTA संघटनेचे अध्यक्ष रवींद्र होले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.मंगेश काकडे सर यांनी केले तर आभार इंदिरा गांधी विद्यानिकेतन चे मुख्याध्यापक श्री शिवाजीराव गवळी सरांनी मानले.